इंदापूर शहरातील सिद्धेश्वर मंदिरतील मानाचा पहिल्या गणपतीची विधीवत प्राणप्रतिष्ठा करून केली स्थापना.
इंदापूर प्रतिनिधी: दिनांक १९ सप्टेंबर २०२३ रोजी गणेश चतुर्थी दिवशी सिद्धेश्वर गणेश मित्र मंडळ सिद्धेश्वर मंदिर इंदापूर शहरातील मानाचा पहिला गणपतीची प्राणप्रतिष्ठा श्री /सौ. दिनेश गुप्ता यांच्या शुभहस्ते करण्यात आली. तसेच इंदापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री/सौ.कापरे व इंदापूर नगरपालिकेचे कर्मचारी वर्ग उपस्थित होते. याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष गणेश भंडारी, उपाध्यक्ष सफल घासकाटू यांच्या नियोजनातून गणेशाची स्थापना करण्यात आली.
या मंडळाची इंदापूर शहरातील गणेश उत्सवाची परंपरा फार जुनी आहे.सन.१९०५ रोजी शंकरराव निलाखे यांनी प्रथम गणेशमूर्ती सिद्धेश्वर मंदिर मधे स्थापना केली . पुढे ही परंपरा १९२५ पासून हरिभाऊ तांबेकर यांनी पुढे चालू ठेवली. इंदापूर शहरातील गणपतीच्या उत्सवाची परंपरा तांबेकर यांची तीसरी पिढीचे संतोष तांबेकर करत आहेत. देश पारतंत्र्यात असताना ही परंपरा इंदापूर मध्ये जोपासली गेली. या मानाच्या गणपती मंडळाने आज ११९ व्या वर्षात पदार्पण केले असून, श्रीकांत काका गुरव ,गिरीश काका गुरव यांनी गणपतीची विधीवत आरती व मंत्र पठण करून पुजन केले . यावेळी उपस्थित सिद्धेश्वर ट्रस्टचे अध्यक्ष प्रसन्न दुनाखे ,खजिनदार निलाखे सर, ट्रस्टचे पदाधिकारी नागेश भंडारी ,महेश भिंगे, कुमारशेठ ढोले,महेंद्रशेठ बानकर,
सुनील भंडारी, प्रमोद भंडारी, प्रा.उंबरदंड, रघुनाथ खरवडे,गोपाळ ढोले,प्रा. महादेव चव्हाण,हमीदभाई आत्तार,गजानन पुंडे काका,संतोष तुरे .मंडळाचे कार्यकर्ते, ओंकार घासकाटू , आकाश भंडारी, अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

