shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिक्षक समितीचे वतीने जिल्हा आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षिका सौ. राजश्री विजयकुमार शेंडे यांचा जाहिर सत्कार.


शिक्षक समितीचे वतीने जिल्हा आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षिका सौ. राजश्री विजयकुमार शेंडे यांचा जाहिर सत्कार.

पुरस्कार मिळाल्याने आनंद झाला,यापुढेही आपणा सर्वांच्या सहकार्याने आदर्शवत काम करेल - राजश्री शेंडे.
इंदापूर प्रतिनिधी:दि 19 पुणे जिल्हा परिषदेचा सन 2023 चा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेबद्दल त्यांचे निवासस्थानी जाऊन प्राथमिक शिक्षक समितीच्या व शिक्षक मित्र परिवाराच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
          जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोसलेवस्ती याठिकाणी कार्यरत असणाऱ्या सौ राजश्री शेंडे यांचे कामाची दखल घेऊन जिल्हा परिषद पुणे यांचे वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हस्ते पुणे येथे पुरस्कार वितरण संपन्न झाले. शिक्षक समितीचे वतीने शाल , श्रीफळ , पुष्पहार देऊन सन्मान करण्यात आला.
           यावेळी इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे माजी चेअरमन सुनिल शिंदे सर,माजी चेअरमन व वरकुटे खुर्द सोसायटीचे चेअरमन किरण म्हेत्रे सर,पुणे जिल्हा शिक्षक पतसंस्थेचे माजी चेअरमन अरुण मिरगणे सर,संचालक प्रताप शिरसट सर,नुतन सचिव शहाजी पोफळे सर,शंकर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन सर्जेराव खूसपे सर,शिक्षक समितीचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य योगेश पांढरे सर,शिक्षक समिती इंदापूरचे कोषाध्यक्ष भारत ननवरे सर,जुनी पेंशन संघटनेचे तालुका अध्यक्ष संतोष हेगडे सर,दिलीप अभंग सर,किरण लंगोटे सर,विजयकुमार शेंडे सर,विकास भोंग सर,संजय भोंग सर,विकास घुगे सर,दत्तात्रय बनकर सर,मनिषा शेंडे-बनकर मॕडम व शेंडे परिवारातील सदस्य उपस्थित होते.

close