shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पळसदेव येथे समृद्धी व शिवशाही भिमशाही प्रतिष्ठान आयोजित दहीहांडी मोहत्सव संपन्न.

पळसदेव येथे समृद्धी व शिवशाही भिमशाही प्रतिष्ठान आयोजित दहीहांडी मोहत्सव संपन्न.

दहीहंडीचे प्रथम पारितोषिक मान  गोविंदा पथकाला .

इंदापूर प्रतिनिधी: पळसदेव येथे समृद्धी व शिवशाही भिमशाही प्रतिष्ठान आयोजित दहीहांडी महोत्सवास प्रारंभ सरपंच आजिनाथ पवार, गावातील ग्रामस्थ
यांच्या हास्ते कार्यक्रमाचा नारळ फोडून  चालू करण्यात आला  यावेळी त्यांचे सर्व सहकारी मेघराज कुचेकर- पाटील , अक्षय  भोसले , विजय भोसले , सुनिल भोसले संकेत भोसले ,  राजेन्द्र ताबीले , युवराज भैया नगरे , अजय बनसुडे , आजित शिंदे ,  अंकुश भोसले , राजेन्द्र कुचेकर , विठल कुचेकर , गणेश काळे , हे उपस्थीत होते
यावेळी अभिनेत्री  स्नेहा पिंपरीकर यांच्या नृत्यआविषकाराचे  प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. दोन्ही प्रतिष्ठानाचे हे दहीहांडी साजरे करण्याचे ५ वे वर्ष होते. 
या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक माजी उपसरपंच प्रतिनिधी मेघराज कुचेकर- पाटील व अक्षय भोसले हे होते. त्यांनी प्रति वर्षीप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा सुंदर आयोजन केले होते .तसेच दहीहंडी फोडण्याचा मान ह्या वर्षी बारामतीच्या गोविंदा पथकाला देण्यात आला होता 
प्रथम पारितोषिक ५१ हाजार रूपायाचे बारामतीच्या संघाने विजय मिळवून परितोषिक  पटकावले अशी माहिती मेघराज कुचेकर पाटील यांनी दिली.

 
close