कुठलाही रस्त्याचा कॉन्ट्रॅक्टर, खडी क्रेशरचा मालक तो जर चुकत असेल .तर त्यांच्यावरती कारवाई होणे हे निश्चित प्रकारे गरजेचे - आमदार दत्तात्रय भरणे.
इंदापूर प्रतिनिधी: कुठलाही रस्त्याचा कॉन्ट्रॅक्टर,कुठल्याही खडी क्रेशरचा मालक असू द्या. तो जर चुकत असेल नियमाचे पालन करत नसेल.तर त्यांच्यावरती कारवाई होणे हे निश्चित प्रकारे गरजेचे आहे असे दिनांक १९ सप्टेंबर २०२३ रोजी गणेश चतुर्थी दिवशी भरणेवाडी येथे माजी राज्यमंत्री तथा इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलताना म्हणाले.
आमदार दत्तात्रय भरणे गणरायाच्या आगमना प्रसंगी इंदापूर तालुक्यासह महाराष्ट्र व देशातील गणेश भक्तांना गणरायाच्या आगमनाच्या शुभेच्छा देत म्हणाले की,
दोन-चार दिवस तालुक्याच्या बाहेर असल्यामुळे काल आंदोलने झाली. मी प्रशासनाला यापूर्वीही सांगितले जे तालुक्यामध्ये खडी क्रेशर असतील. जे नियमाने वागत नसतील, नियम डावलून कुठल्या खडी क्रशरचं काम चाललं असलं ,तर तो चुकीचा चालवत असलं, त्याच्यावरती सुद्धा प्रशासनाने कारवाई करावी.
त्यामध्ये कुठलेही प्रकारे कोण जवळचा कोण लांबचा याचा विचार करू नये. शेवटी जनतेचार प्रतिनिधी काही कुठल्या खडी क्रेशरचा प्रतिनिधी नाही. कोण काय येतो. आरोप करतो. याबाबतीत मी काय जास्त बोलणार नाही. संपूर्ण तालुक्याला आमचं भरणे कुटुंब माहित आहे. मी स्वतः माहित आहे.
कोणी कसला आरोप करल. मी महत्व देत नाही. उलट आरोप करणाऱ्याला परमेश्वराने सदबुद्धी द्यावी खरंतर त्यांना गणरायाने सदबुद्धी द्यावी. कुठेतरी आपण कोणावर आरोप करताना प्रसिद्धी व्हावी. या बातमीला कुठेतरी महत्त्व यावं. यासाठी आपण बिन बुडाचे कुठेतरी चुकीचे आरोप त्यांनी करू नयेत. तसेच आमदार भरणे म्हणाले की,ते म्हणाले आमदारांचं दुर्लक्ष आहे .मी त्यांनी केलेल्या सूचनेचे स्वागत करतो. आणि प्रशासनाला सांगतो की, ताबडतोब जे कोण चुकीचे खडी क्रेशरवाले असतील. त्यांच्यावरती कारवाई करावी.
---------------------------------------
चौकट:
*इंदापूर तालुक्यात विकास काम खूप मोठ्या प्रमाणात चालू असल्याने खडी क्रेशरची संख्या जास्त - आमदार दत्तात्रय भरणे.*
आपल्या सर्वांना माहित आहे की. इंदापूर तालुक्यामध्ये गेले नऊ दहा वर्ष झालं, खूप विकासाच्या बाबतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम चालू आहेत. आणि मोठ्या प्रमाणात काम चालू असल्यामुळेच खडी क्रेशरची संख्या इंदापूर तालुक्यामध्ये ज्यादा आहेत. रस्त्याच्या बाबतीत कॉन्ट्रॅक्टर याने पीडब्ल्यूडी च्या बाबतीत हलगर्जीपणा केला असला तरी कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरची पाच वर्षाची कामाची जबाबदारी त्यांच्यावर राहते. त्यातून एखाद्या कॉन्ट्रॅक्टरने चुकीचे काम केले असलं किंवा ज्या अधिकारी यांनी हलगर्जीपणा केला. कॉन्ट्रॅक्टर प्लस अधिकाऱ्यांवर सुद्धा निश्चित प्रकारे कारवाई करावी. याबाबतीत शासनाला, आमचे मंत्री असतील, वरिष्ठ अधिकारी असतील, यांना त्याबाबतीमध्ये सूचना करणार आहे.
-----------------------------------------/
*_ह्या लोकांचं उपजीविकेचे साधन काय आहे. हे जर आपण पाहिलं तर याचे उत्तर आपल्याला मिळेल._*
आज गणपती आगमनाचा दिवस आहे यानिमित्ताने सांगतो की, कोणी कोणावर माझ्यावरती आरोप केले आहेत .त्या लोकांना आपण तपासलं .जे लोक आहेत. त्या लोकांचं रेकॉर्ड काय आहे . ह्या लोकांचं उपजीविकेचे साधन काय आहे. हे जर आपण पाहिलं तर याचे उत्तर आपल्याला मिळेल. मला त्या लोकांचा नाव घेऊन त्यांना मोठे करायचं नाही. परंतु बंधुंनो निश्चित प्रकारे आज आपण गणरायाला सगळ्यांनी साकडं घातलेल आहे. नक्की पाऊस लवकरात लवकर तालुक्यामध्ये पडावा अशी प्रार्थना आपल्या सगळ्यांच्या वतीने गणपतीला केलेले आहे .लवकरच पाऊस पडेल अशा शब्दात माजी राज्यमंत्री व आमदार दत्तात्रय भरणे यांनी आपले मत व्यक्त केले.

