शेतकरी, व्यापारी, शेतमजूर अडचणीत आहेत. खूप मोठा पाऊस या तालुक्यामध्ये व्हावा. माझ्या तालुक्यावरील असणारी धरणे भरावीत - आमदार दत्तात्रय भरणे यांनी घातले गणरायाला साकड.
इंदापूर प्रतिनिधी: दिनांक १९ सप्टेंबर २०२३ रोजी गणेश चतुर्थी दिवशी श्री गणरायाच्या आगमनाप्रसंगी भरणेवाडी येथील माजी राज्यमंत्री तथा इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलताना गणरायाच्या आगमना प्रसंगी इंदापूर तालुक्यासह महाराष्ट्र व देशातील गणेश भक्तांना गणरायाच्या आगमनाच्या शुभेच्छा देत पावसासाठी साकडेही घातलं. तसेच ते म्हणाले की,आज गणरायाचं आगमन संपूर्ण देशामध्ये राज्यात व आपल्या तालुक्यात खूप मोठ्या थाटामाटामध्ये आगमन झालेले आहे. मी माझ्या इंदापूर तालुक्यातील सर्व जनतेला या गणरायाच्या आगमनाच्या शुभेच्छा देतो. शुभेच्छा देताना मी गणरायाला एकच साकडं घालतो की, आपल्या राज्यावरती, तालुक्यावरती खूप मोठं दुष्काळाचं सावट आहे. शेतकरी, व्यापारी, शेतमजूर अडचणीत आहेत. यासाठी मोठा पाऊस होणे खूप गरजेचे आहे. खूप मोठा पाऊस या तालुक्यामध्ये व्हावा. माझ्या तालुक्यावरील असणारी धरणे आहेत. ती धरणे लवकरात लवकर भरावी . ही गणरायाकडे मी साकड घालतो. पाऊस जर नाही पडला तर खूप मोठ्या बिकट परिस्थितीला सामोरे जावं लागेल. ती बिकट परिस्थिती येऊ नये यासाठी पाऊस लवकरात लवकर पडावा ही गणपती चरणी नतमस्तक होऊन साकडे घालतो. आज खूप चांगला उत्साह आहे आज गणरायाचं आगमन झालेलं आहे. अशा शब्दात आमदार दत्तात्रय भरणे यांनी सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

