shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वक्रतुंड गणेश मंडळ केज च्या वतीने सांप्रदायिक सांस्कृतिक व आरोग्य निदान शिबिराचे नियोजन..!!



प्रकाश मुंडे / बीड जिल्हा प्रतिनिधी :-

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वक्रतुंड गणेश मंडळ व वक्रतुंड सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे प्रत्येक वर्षी विविध उपक्रम राबवण्याची परंपरा वक्रतुंड सामाजिक प्रतिष्ठान व वक्रतुंड गणेश मंडळांनी कायमस्वरूपी टिकून ठेवले आहे यावर्षीही विविध कार्यक्रमाचे आयोजन या मंडळाच्या वतीने करण्यात आलेले आहे. सात दिवसीय भागवत कथा व कीर्तन महोत्सवाचे आयोजन त्याचबरोबर अनेक आजारांवरती उपचार व आरोग्य तपासणी याचेही आयोजन या मंडळाच्या वतीने करण्यात आलेले आहे. 

यावर्षी ठेवण्यात आलेल्या भागवत कथेचे प्रवक्ते म्हणून ह भ प भागवताचार्य बाळू महाराज उगले यांचे अमृततुल्य असे संगीतमय भागवत कथा होणार आहे . त्याचबरोबर लहान मुलांचे खेळ व महिलांसाठी संगीत खुर्ची व खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आलेले आहे . तसेच पाच दिवसीय आरोग्य तपासणी शिबिर व त्या आजारावरती योग्य तो आधुनिक प्रकारे उपचार केले जाणार आहेत या उपचारासाठी व या आरोग्य तपासणी करिता पंजाब येथील तज्ञ डॉक्टरांची टीम पाचरण केलेली आहे वक्रतुंड गणेश मंडळाच्या वतीने करण्यात आलेले आहे यामध्ये सांधेदुखी, गुडघेदुखी ,कंबर दुखी, ब्लड प्रेशर, मधुमेह, पॅरलेस, मोटापा, अर्थ राईट इस गॅस कब्ज, मुळव्याध ,त्वचांचे विकार, थायरॉईड अशा अनेक आजारांचे या ठिकाणी तपासणी व निदान केले जाणार आहे. यावरती उपचार करण्यात येणार आहे तसेच या गणेश मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या भागवत कथेचे वेळ दुपारी दोन ते पाच अशी आहे . दररोज सायंकाळी आठ ते दहा कीर्तन महोत्सव आणि या कीर्तन महोत्सवाचे आयोजन ही करण्यात आलेले आहे.
close