shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

दहिफळ (वड) येथे कै.चंद्रकलाताई गदळे यांच्या पुण्यस्मरणा निमित्त समाधान शर्मा महाराज यांच्या कीर्तनाचे शुक्रवारी आयोजन..!!


----------------------------------
प्रकाश मुंडे / बीड जिल्हा प्रतिनिधी :-                        
केज तालुक्यातील दहिफळ (वड) येथील सेवानिवृत्त प्राचार्य तथा शालेय संस्थापक सखाहारी (तात्या) गदळे यांच्या पत्नी व भाजपाचे युवा नेते राहुलभैय्या गदळे यांच्या मातोश्री कै.सौ.चंद्रकलाताई सखाहारी गदळे यांच्या द्वितीय पुण्यस्मरण  कार्यक्रमा निमित्त दि.२२ सप्टेंबर शक्रवार रोजी सकाळी साडेदहा वाजता सुप्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प. समाधान शर्मा महाराज यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.तरी या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहण्याची विनंती गदळे परीवाराच्या वतीने करण्यात आली आहे.

केज तालुक्यातील दहिफळ वडमाऊली येथील येथील 
सेवानिवृत्त प्राचार्य तथा शालेय संस्थापक सखाहारी (तात्या) गदळे यांच्या पत्नी व भाजपाचे युवा नेते राहुलभैय्या गदळे यांच्या मातोश्री कै.सौ.चंद्रकलाताई सखाहारी गदळे यांच्या द्वितीय पुण्यस्मरण कार्यक्रमा निमीत्त दहिफळ (वड) ता.केज येथील श्रीक्षेत्र वडमाऊली मंदीरा जवळ ह.भ.प.सखाहारी (तात्या) गदळे यांनी स्थापन केलेल्या शिवप्रतिष्ठाण संस्थान येथे सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प.समाधान शर्मा महाराज यांच्या सुश्राव्य किर्तनाचा कार्यक्रम शुक्रवार दि.२२ सप्टेंबर रोजी सकाळी साडे दहा वाजता आयोजित केला आहे.तरी या कार्यक्रमास आपण उपस्थित रहावे अशी विनंती ह.भ.प. सखाहारी (तात्या) गदळे, युवा नेते राहुलभैय्या गदळे,डॉ शशिकांत दहिफळकर ,इंजि.शरद गदळे,सरपंच अनिताताई गदळे,डॉ शालिनी कराड (गदळे)
,जयदत्त दहिफळकर व गदळे परिवाराने केली आहे.
close