shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या ठिकाणी मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ इंदापुरात पडसाद.

   जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी  या ठिकाणी मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ इंदापुरात पडसाद.                                                               
इंदापूरात कडकडीत बंद  तर जुन्या पुणे-सोलापूर महामार्गांवर बस स्थानकासमोर रास्ता रोको                                  
इंदापूर :  अंतरवाली सराटी (जि. जालना ) या ठिकाणी मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ सोमवारी (दि.४) इंदापूरात कडकडीत बंद पाळण्यात आला. तर जुन्या पुणे-सोलापूर महामार्गांवर बस स्थानकासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.यावेळी तहसीलदार श्रीकांत पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना मराठा आरक्षणासह विविध मागण्यांचे निवेदन मराठा क्रांती मोर्च्याच्या वतीने देण्यात आले.

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे संविधानिक मार्गाने चाललेल्या आंदोलनावरती बेछूठ लाठी हल्ला केला गेला त्या घटनेची सखोल चौकशी व्हावी. मराठा समाजाला कुणबी चे दाखले देण्यात यावेत. नोकरी आणि शिक्षणामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. प्रशासनाने मराठा आरक्षणाकरीता आवश्यक त्या तरतुदी केल्या पाहिजेत अशा व अन्य स्वरूपाच्या मागण्या मराठा क्रांती मोर्चा च्या वतीने शासनाकडे करण्यात आल्या आहेत. 

दरम्यान, छत्रपती क्रांती सेना व मराठा समाज बांधवांकडून पुकारण्यात आलेल्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सोमवारी सकाळी पासूनच अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दैनंदिन व्यवहार ठप्प होते.बंद दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त तैनात केला होता.बंद ला विविध संघटनांकडून पाठिंबा दर्शविण्यात आला. बस सेवा बंद असल्याकारणाने प्रवाशांची अतोनात गैरसोय झाली.
close