श्रीरामपूर प्रतिनिधी:
विद्यार्थ्यांनी ज्या क्षेञाची आवड आहे त्याची निवड करावी.असे केले तर निश्चितच यश मिळते आणि आयुष्य घडते. विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच लोकशाही व निवडणुकीचे धडे अशोक ग्रुप आॕफ स्कूलच्या माध्यमातून मिळते याचे समाधान वाटते, असे प्रतिपादन पोलिस उपअधिक्षक बसवराज शिवपुजे यांनी केले. तालुक्यातील अशोकनगर येथील अशोक कारखाना संचलित अशोक आयडीअल स्कूलच्या विद्यार्थ्यांचा पदग्रहण सोहळा माजी आ.भानुदास मुरकुटे यांचे अध्यक्षतेखाली तसेच डी.वाय.एस.पी. शिवपूजे व स्कूलच्या मार्गदर्शक संचालिका सौ.मंजुश्रीताई मुरकुटे यांचे उपस्थितीत संपन्न झाला. त्याप्रसंगी प्रमुख अतिथी श्री.शिवपुजे यांनी मनोगात व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणात श्री.मुरकुटे म्हणाले की, नेतृत्वगुण हे विद्यार्थीदशेतच विकसित होतात. विद्यार्थी असतानाच व्यक्तीमत्व विकासाची संधी असते, ती विद्यार्थ्यांनी साधून आपला व्यक्तिमत्व विकास केला पाहिजे.
कारखाना संचालिका तथा ग्रुप आॕफ स्कूलच्या संचालिका सौ.मंजुश्रीताई मुरकुटे यांनी पदग्रहण केलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले, तसेच त्यांचे वाटचालिस शुभेच्छा दिल्या. प्रास्तविक प्रा.रईस शेख यांनी केले. याप्रसंगी बाबासाहेब आदिक, सौ.शितलताई गवारे, प्राचार्य संपत देसाई आदी उपस्थित होते. सुनिल बागुल यांनी सूञसंचलन केले. रोमा भाटीया यांनी आभार मानले.
संकलन:
समता न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर - 9561174111

