shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्रीरामपूर शहर काँग्रेसच्या वतीने थोर समाजसेविका भारत रत्न संत मदर तेरेसा यांची पुण्यतिथी साजरी...


 श्रीरामपूर प्रतिनिधी:
श्रीरामपूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने थोर समाजसेविका व नोबल पुरस्कार विजेत्या भारत रत्न संत मदर तेरेसा यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. संत मदर तेरेसा यांचा जीवन प्रवास प्रेरणादायी असून त्यांनी आपले संपूर्ण जीवन मानवसेवेसाठी समर्पित केले. संत मदर तेरेसा या सामाजिक कार्य करणाऱ्या महिलांसाठी खरोखर प्रेरणास्थान असून अनेक अनाथालय, आश्रम व रुग्णालयांच्या माध्यमातून त्यांनी लोकांची सेवा केली.संत मदर तेरेसा यांनी गरीब,बेघर आणि गरजवंतांना आपलं करून त्यांना आधार दिला.संत मदर तेरेसा यांनी भारतातच नव्हे तर इतर देशांमध्ये देखील मिशनरीज ऑफ चारिटी या संस्थेचा विस्तार केला.अनाथ मुले , गरीब,पीडित व असाह्य वृद्धांची सेवा करत लोकांना खऱ्या अर्थाने निस्वार्थी भावनेने जगण्याची नवी प्रेरणा दिली.त्यांच्या या महान कार्याची दखल घेत संत मदर तेरेसा यांना नोबेल पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.


 यावेळी संत मदर तेरेसा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी साईबाबा संस्थानचे विश्वस्त सचिन गुजर, मा.नगरसेवक के.सी. शेळके, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीस सौ. दिपालीताई ससाणे, मास्टर सरवरअली सय्यद ,अशोक जगधने, सुरेश ठुबे, रितेश एडके, डॉ राजेंद्र लोंढे, युनुस पटेल, सुनील साबळे, सनी मंडलिक, लेविन भोसले, संजय गोसावी, कमलाकर पंडित, विजय त्रिभुवन, सुरेश कोळगे, विशाल साळवे, राजेश जोंधळे, निलेश बोरावके, गोपाल भोसले, फादर संपत भोसले, फ्रान्सिस  शेळके, राकेश दुशिंग, सिस्टर जॅकलीन, सिस्टर रिटा, सिस्टर लीली, सिस्टर रोजी, सिस्टर प्रभा आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*संकलन:*
समता न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर - *9561174111*
close