shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

तेजपृथ्वी ग्रूपच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचा सन्मान .

तेजपृथ्वी ग्रूपच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचा सन्मान .
इंदापूर प्रतिनिधी: आज इंदापूर येथे तेजपृथ्वी ग्रुपच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचा सन्मान करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .
यावेळी संतोष हेगडे अध्यक्ष जुनी पेन्शन हक्क संघटना ,सुहास मोरे अध्यक्ष कास्ट्राईब शिक्षक संघटना, मंगेश शेंडे अध्यक्ष इष्ठा शिक्षक संघटना, सतीश शिंदे अध्यक्ष शिक्षक भारती संघटना , मिसाळ गुरुजी,हे व इतर शिक्षक उपस्थीत होते.  
यावेळी तेजपृथ्वी ग्रुपच्या अध्यक्षा अनिताताई खरात म्हणाल्या की, सध्या जिल्हा परिषदेच्या शाळेची गुणवत्ता अतिशय सुधारली असून जिल्हा परिषदेचे शिक्षक अतिशय उत्तम अशा प्रकारे मुलांना समाजात सर्व ज्ञान कसे होईल या प्रकारे शिकवण्याचा प्रयत्न करत आहेत.शासनाने ही शिक्षकांसाठी जेवढे होईल तेवढे जास्तीत जास्त सवलती उपलब्ध करून देण्यात याव्यात तसेच शिक्षकांना शिकवण्या व्यतिरिक्त  ईतर कामात शासनाने गुंतवून पाडू नये, 
यावेळी  संतोष हेगडे गुरुजी म्हणाले की, तेजपृथ्वी ग्रुपचे नेहमीच आम्हाला सहकार्य असते. पाठीमागील आंदोलनात किंवा इतर शिक्षण क्षेत्रातील सामाजिक कामात तेजपृथ्वी ग्रूपने नेहमीच साथ दिली आहे. 
यावेळी तेजपृथ्वी ग्रुपच्या संस्थापक अध्यक्षा अनिताताई खरात, गणेश  शिंगाडे, दुर्योधन पाटील, अरुण भोसले  बारामती महिला तालुका अध्यक्षा सुनंदा ताई रणवरे, अकलूजचे उद्योजक ओरसे साहेब व इतर मान्यवर उपस्थित होते.
close