shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अंतरावली येथील मराठा समाजावरील अत्याचाराची जबाबदारी स्वीकारून तिघाडी सरकार त्वरित बरखास्त करण्यात यावे; श्रीरामपूर सकल मराठा समाजाची मागणी


श्रीरामपूर प्रतिनिधी:
जालना जिल्ह्यातील अंतरावली येथे मराठा आरक्षण व इतर मुद्द्यांकरीता सनदशीर मार्गाने आंदोलन करणाऱ्या मराठा समाजातील महिला,पुरुष व लहान मुलांवर पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या लाठी हल्ल्यामुळे अनेक जण जखमी झाले.या घटनेचा निषेध म्हणून श्रीरामपूर येथील सकल मराठा समाजाच्यावतीने आज शनिवार दि.०२ सप्टेंबर २०२३ रोजी श्रीरामपूर प्रांत अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात असे म्हटले आहे की,जालना अंतरावली येथील घटनेची जबाबदारी सरकारने स्वीकारून गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा तसेच तिघाडी सरकार त्वरित बरखास्त करण्यात यावे अशी या निवेदनात मागणी करण्यात आली आहे. तसेच हल्ला करण्याचा आदेश कुणी दिला ?, त्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी देखील मागणी करण्यात आलेली.आहे

यावेळी निवेदन देताना समस्त मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
*संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close