shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

क्रा .चंद्रशेखर आझाद युवा प्रतिष्ठान चा दहीहंडी महोत्सव होणार धडाकेबाज

 प्रतिनिधी : संजय वायकर

नगर : ४ /   क्रा. चंद्रशेखर आझाद युवा प्रतिष्ठान अहमदनगर आयोजित दहीहंडी महोत्सव गुरुवार दिनांक ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता नगर शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर चौक, चौपाटी कारंजा येथे आयोजित केला असून रुद्रनाथ ढोलपथकाच्या तालावर ठेका धरत सदर कार्यक्रम रंगतदार होणार आहे . या प्रतिष्ठान ची दहीहंडी नगर जिल्ह्यातील अतिशय लोकप्रिय असुन सर्व तरुण युवकांची लक्षणिय उपस्थिती दिसुन येते .

सदर दहीहंडी महोत्सवास सर्व युवकांनी नागरिकांनी उपस्थित रहावे असे आयोजकांनी सांगितले आहे .

याप्रसंगी महाराष्ट्राची लोकधारा यांचा पांरपारीक मराठ मोळा लोकनृत्य व लोककलेचा कार्यक्रम होणार असल्याचे ही आयोजक व प्रतिष्ठान चे अध्यक्ष मयूर शिवकुमार बोचुघोळ यांनी सांगितले आहे .
close