shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्री. धनलक्ष्मी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित इंदापूर वर्धापन दिन निमित्त वह्यावाटप.


श्री. धनलक्ष्मी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित इंदापूर वर्धापन दिन निमित्त वह्यावाटप.
इंदापूर प्रतिनिधी: आज दिनांक १ सप्टेंबर २०२३'; रोजी धनलक्ष्मी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित इंदापूर या पतसंस्थेच्या वर्धापन दिन निमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंदापूर नंबर ०४ व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंदापूर नंबर ०६ या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना लेखनसाहित्य वह्या व पतसंस्थेची दिनदर्शिका वाटप कार्यक्रम घेण्यात आला.

  यावेळी श्री धनलक्ष्मी ग्रामीण शेती सहकारी पतसंस्थेचे चेअरमन  सुनील जाधव ,संचालक अनिल जाधव, दिलीप फडतरे , फिरोज पठाण सौ. उषा जाधव  रेवन चव्हाण, सचिन गरुड तसेच संस्थेच्या सचिव सौ.सुमित्रा चव्हाण पतसंस्थेचे कर्मचारी सौ.पौर्णिमा मॅडम गणेश मदने , विकास क्षीरसागर तसेच जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक  वासुदेव पालवे सर व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर ०६ चे मुख्याध्यापक विलास शिंदे सर शाळेतील शिक्षक वृंद विकास घुगे सर सौ. वैजयंता घुगे मॅडम, सुरेश लोंढे सर, दिनेश काळे सर हे उपस्थित होते.*
*श्री धनलक्ष्मी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेने थोड्या कालावधीमध्ये अगदी भरीव अशी कामगिरी केलेली आहे तसेच सामाजिक उत्तरदायित्वाची जाण ठेवून आज पतसंस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा अत्यंत स्तुत्य असा उपक्रम राबविला आहे. येणाऱ्या काळामध्ये श्री धनलक्ष्मी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची उत्तरोत्तर अशीच प्रगती होवोत अशी भावना दोन्ही शाळेच्या मुख्याध्यापक यांनी व्यक्त केली.*
 *कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश काळे सर यांनी केले व आभार  विकास घुगे सर यांनी मानले.*

close