shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

विश्वासराव रणसिंग महाविद्यालयात ३५वर्ष अखंड कार्यमग्न राहून शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे शिस्तप्रिय आदर्शवत प्राध्यापक डॉ. अरुण कांबळे होय.

विश्वासराव रणसिंग महाविद्यालयात ३५वर्ष अखंड कार्यमग्न राहून  शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात  उल्लेखनीय कार्य करणारे शिस्तप्रिय आदर्शवत प्राध्यापक डॉ. अरुण कांबळे होय.
इंदापूर प्रतिनिधी: विद्यार्थी हेच आपले दैवत आणि अध्यापन हीच आपली पूजा हे लक्षात घेऊन. अनेक विद्यार्थ्यांना घडविणारे व्यक्तिमत्व म्हणजे प्रा. डॉ. अरुण कांबळे. यांचा जन्म १४ ऑगस्ट १९६३  रोजी रत्नपुरी  वालचंदनगर ता. इंदापूर जि. पुणे या ठिकाणी झाला. त्यांचे वडील  मारुती दगडू कांबळे व आई  सोजाबाई मारुती कांबळे यांनी ‘महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ’ रत्नपुरी ऊसमळा  या ठिकाणी अत्यंत कष्ट- परिश्रम करून त्यांना शिकविले .
त्यांचे प्राथमिक शिक्षण १९७० ते १९७७ यादरम्यान ‘रत्नपुरी पाठशाळा रत्नपुरी’ या ठिकाणी व ‘माध्यमिक शिक्षण वालचंद विद्यालय व ज्युनियर कॉलेज कळंब’ या ठिकाणी १९७७ ते १९८० या कालावधीत पूर्ण झाले. तसेच महाविद्यालयीन अकरावी ते एम कॉम चे शिक्षण बारामती येथील ‘तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय’ येथे १९८१-८२  ते  १९८६-८७ या कालावधीत पूर्ण झाले. प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालयीन जीवनात त्यांना प्रामाणिक, विश्वासू, गुणवान, व इमानदार शिक्षकांनी त्यांच्या  ज्ञानाच्या तिजोरीत चांगली भर टाकली व आपले व्यक्तिमत्व घडून आले.
त्यांच्या प्राध्यापक म्हणून शैक्षणिक अध्ययन अध्यापन  कारकिर्दीची सुरुवात १९८७-८८ यादरम्यान पुणे येथील “डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय” येरवडा,  याठिकाणी काम करीत असताना झाली. त्यानंतर ‘कला आणि वाणिज्य महाविद्यालय’ कळंब सध्याचे विश्वासराव रणसिंग महाविद्यालय (कला, वाणिज्य व विज्ञान) कळंब-वालचंदनगर या ठिकाणी १९८८-८९या दरम्यान नेमणूक झाली.तेंव्हापासून आजपर्यंत त्यांनी अव्याहतपणे शिक्षण क्षेत्राचे पवित्र कार्य करीत आहेत. आज त्यांनी या क्षेत्रामध्ये या महाविद्यालयात ३५वर्षे अखंड सेवा करून अनेक चांगले विद्यार्थी घडविले आहेत. आज चांगल्या पद्धतीने आपले विद्यार्थी  जीवन व्यतीत करीत आहेत.
अकाउंटिंग हा त्यांचा अत्यंत आवडीचा विषय होता.ते महाविद्यालयीन जीवनात बँकिंग, मॅथेमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स, फायनान्शिअल अकाउंटिंग, कार्पोरेट अकाऊंटिंग, एडव्हान्स अकाउंटिंग, व्यवसाय व्यवस्थापन, हिशेब तपासणी व आयकर , व्यापार विषयक कायदे, असे विषय पदवी स्तरावर (बीकॉम)  व पदवीव्युत्तर (एम.कॉम) ला मॅनेजमेंट अकाउंटिंग, प्रोजेक्ट वर्क यासारखे विषय अत्यंत सचोटीने  विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत समजेल अशा पद्धतीने त्यांनी शिकविले. 
महाविद्यालयीन जीवनात त्यांनी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी तसेच विद्यार्थी कल्याण मंडळ अधिकारी म्हणून अत्यंत चांगले काम केले आहे. त्यांनी या माध्यमातून वृक्षारोपण, बंधारे बांधणे, ग्रामस्वच्छता, समाज प्रबोधनपर व्याख्याने व कार्यक्रम, विविध महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी, विद्यार्थी विकासाचे विविध उपक्रम, उद्योजकता विकास कार्यक्रम (उटणे,शिकेकाई व परफ्यूम उत्पादन व वितरण), विविध उद्योगांना भेटी, स्पर्धा परीक्षांचे आयोजन, सहलींचे आयोजन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परीक्षक व पेपर सेटर म्हणून उत्कृष्ट काम केलेले आहे. त्यांनी एक शिस्तप्रिय व विद्यार्थी प्रिय प्राध्यापक म्हणून महाविद्यालयामध्ये काम केलेले आहे. अनेक चांगले विद्यार्थी घडवण्यामध्ये व त्यांना चांगली शिस्त लावण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे.वयाच्या  ५८ व्या वर्षी त्यांनी पीएच.डी हि उच्च पदवी संपादन केली.  त्यांच्या कार्यामुळे इतरांना प्रेरणा मिळत आहे. याबद्दल इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान निमसाखर व  विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळंब यांना याचा फार मोठा अभिमान आहे. 
त्यांच्या महाविद्यालयीन जीवनाच्या कारकिर्दीमध्ये त्यांची सहचारिणी  लता अरुण कांबळे यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या तीनही मुलांना घडवण्यामध्ये त्यांची पती-पत्नी, आई-वडील व शिक्षकांचा  मोलाचा वाटा आहे. प्रज्ञा ही बीएससी ऍग्री असून एमबीए व स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करीत आहे. कल्याणी ही ‘बी.ए.एम.एस’ ची पदवी घेऊन आज डॉक्टर म्हणून काम करीत आहे. तर मुलगा प्रतीक हा ‘एंअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनिअर ’असून सध्या बेंगलोर येथे काम करीत आहे. यांना आयुष्यभर पुरेल अशा प्रकारचे शाश्वत असे विद्यादानाचे कार्य ते करत आहेत. 
३५ वर्षाची प्रदीर्घ सेवा पूर्ण करण्यासाठी त्यांना संस्था, महाविद्यालयीन प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी, आजी व माजी विद्यार्थी, हितचिंतक,आपले कुटुंबीय , मित्र परिवार व नातेवाईक  यांचे मोलाचे सहकार्य लाभले. भावी राष्ट्र निर्माण करण्यात त्यांचे योगदान अतुलनीय आहे. याची त्यांना जाणीव आहे. संस्था व महाविद्यालय यांच्या प्रगतीमध्ये त्यांचा मोठा हातभार आहे.म्हणूनच संस्थेने त्यांची नोव्हेंबर २०२२ रोजी उपप्राचार्य पदी निवड केली असून त्यांच्या या पदाला योग्य न्याय दिला. त्यांनी संस्था व महाविद्यालय हे एक कुटुंब मानून विद्यादानाचे पवित्र कार्य केले.ते ३१ ऑगस्ट ,२०२३ रोजी सेवानिवृत्त होत झाले. ३५वर्ष अखंड कार्यमग्न राहून त्यांनी शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याचा  आदर म्हणून सेवापूर्ती समारंभ दोन सप्टेंबर रोजी संस्थेच्या वतीने सन्मानपूर्वक करण्यात येत आहे हे त्यांचे कार्याचे फळ आहे .
close