shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बीडमध्ये वडार समाज संघटनेचा महामेळावा संपन्न..!वडार समाजाच्या प्रश्नासाठी शासन दरबारी पाठपुरावा करणार, माजी मंत्री महादेव जानकर


बीड प्रतिनिधी अंकुश गवळी

बीड शहरातील विश्वदत्त लॉन्स येथे वडार समाज संघटना महाराष्ट्र राज्य भटक्या विमुक्त जाती-जमाती सामाजिक आधार संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने भटक्या विमुक्त जाती जमाती स्वतंत्र दिवस व अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमास माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी उपस्थित राहुन मार्गदर्शन केले.  यावेळी मंचावर माजी मंत्री महादेवजी जानकर, मा. श्री. टी.एस चव्हाण, रमेश गालफाडे, वडार समाज संघाचे प.म.अध्यक्ष रामचंद्र मंजुळे, वडार समाज संघाचे प्रदेश सचिव व पत्रकार रमेश जेठे, चिलेखनवाडी सरपंच तुकाराम गुंजाळ,
जगदीश काळे, दादासाहेब मुंडे, अण्णा साहेब मतकर , भगवान माने, धोंडीबा उफाळकर, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

 याप्रसंगी उपस्थित माजी मंत्री महादेव रावजी जानकर राष्ट्रीय समाज पक्ष सुशील कुमार, राष्ट्रीय सचिव 
यांच्या उपस्थितीमध्ये हा महामेळावा संपन्न झाला, या मेळाव्यासाठी अठरापगड जातीची सर्व लोक जमा  झाले होते, यांच्या वेगवेगळ्या समस्या त्या त्यांनी  जानकर साहेब व अण्णा यांच्यासमोर मांडले असता आम्ही या प्रश्नासाठी  दरबारी प्रयत्न करू असे सांगितले,  तसेच या मेळाव्यामुळे राष्ट्रीय समाज पक्षाला नक्कीच बळकटी मिळेल कारण की आज प्रस्थापित पक्ष हे जनतेच्या नजरेत विश्वास पात्र राहिले नाहीत, त्यामुळे राष्ट्रीय समाज पक्ष असेल किंवा इतर घटक पक्षांना चांगले दिवस येतील.


याप्रसंगी या कार्यक्रमाला विष्णू दादा देवकते ,राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब मतकर सर ,राष्ट्रीय समाज पक्ष जिल्हाध्यक्ष सचिन जगताप ,भगवान माने सर ,मारुती दादा मतकर ,विक्रम सोनसळे, शिवाजी चांगण, तुषार उंबरे, माऊली मार्कड ,काशीद परमेश्वर, दादासाहेब मुंडे ,कल्पेश भोंडवे, आबा बोडके ,गोवर्धन गोरे ,सौ किरण डोळस ,अश्विनी फाटक, रामा लकडे,राजू उपळकर ,वसंत जाधव,स़जय उपळकर आदी मान्यवर उपस्थित होते.सुत्रसंचलन प्रा.श्रीराम जाधव यांनी केले.तर आभार पत्रकार रमेश‌ जेठे यांनी मानले, 

कार्यक्रमाचे आयोजक राजाराम जाधव , धोंडीबा उपळकर यांच्या नियोजनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला.
close