shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शेळगाव केंद्राची शिक्षण परिषद उत्साहात संपन्न*

*शेळगाव  केंद्राची शिक्षण परिषद उत्साहात संपन्न*
    इंदापूर  प्रतिनिधी :   दिनांक ०१/०९/२०२३ रोजी दुपारी २.०० ते ५ या वेळेत जिल्हा परिषद प्राथमिक  गौराईमळा येथे  माहे-ऑगस्ट २०२३ ची केंद्रस्तरीय शिक्षण परिषद पुष्प-दुसरे आयोजित करण्यात आले.
      या शिक्षण परिषदेचे *प्रास्ताविक गौराईमळा शाळेचे मुख्याध्यापक प्रताप शिरसट सरांनी केले.* 
     उपस्थित सर्व शिक्षकांनी केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेची पूर्व चाचणी लिंक सोडवली. 
        शिक्षण परिषदेसाठी सुलभक महादेवनगर शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका आस्मा सय्यद  मॅडम यांनी *नवीन शैक्षणिक धोरण व अध्ययन निष्पत्ती विषय मराठी* या विषयावर मार्गदर्शन केले त्या मध्ये विषय व इयत्तेनुसार अध्ययन  निष्पती याचा उहापोह करुन गटानुसार गटकार्य व शिक्षक सहभाग घेतला उपस्थित सर्व शिक्षकांनी गट कार्यात सहभाग घेतला.
         नलवडेवस्ती शाळेचे उपक्रमशील शिक्षक नंदकुमार जाधव सर  यांनी *इंग्रजी अध्ययन निष्पत्ती विषयी* मार्गदर्शन केले तसेच शेळगाव शाळेचे संतोष वाघ व गोतोंडी  शाळेचे मुख्याध्यापक विकास दराडे सर यांनी या विषयांच्या संदर्भाने इंग्रजी ज्ञान व मुलांचा सहभाग मुलांना कसे बोलते करावे या बाबतीत मार्गदर्शन केले.
      या वेळी केंद्रात नव्याने रुजु झालेल्या शिक्षकांचे शाल व डायरी देऊन सन्मान करण्यात आला.तसेच या वेळी सर्व शिक्षक बंधु भगिनींना चहा व नाष्ट्याची सोय करण्यात आली 
        शेळगाव केंद्राचे केंद्र प्रमुख सन्मान. सुपूते साहेब यांनी प्रशासकीय सुचना व अध्ययन निष्पत्ती बाबतीत मार्गदर्शन केले.
               शिक्षण परिषदेसाठी 
सुत्रसंचालन तेलओढा शाळेचे मुख्याध्यापक सन्मान.परशुरामजी मोहिते सर यांनी केले तसेच उपस्थित सर्व शिक्षकांचे आभार मानले अशा पद्धतीने केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेची सांगता  करण्यात आली .
close