शिर्डी प्रतिनिधी : ( संजय महाजन ) सामाजिक बातमी
आरोग्य विभागातील संस्थान कंत्राटी कर्मचारी संजय यादव यांचे निधन झाले होते. त्यांचेवर त्यांचे कुटुंब पत्नी ,चार मुली दोन मुले अवलंबून होते. संजय यादव हे दुसऱ्याचे जागेत राहून आपले कुटुंब चालवत होते. त्यांचे अचानक निधनामुळे त्यांचे कुटुंब पूर्णपणे उघड्यावर आले त्यांना थोडीशी मदत म्हणून आरोग्य विभागातील कर्मचारी बांधव यांनी काही मदत जमा केली ती आज संस्थान कर्मचारी यांचे कुटुंब प्रमुख मा.मुख्य कार्यकारी अधिकारी सो,उप.मुख्य कार्यकारी अधिकारी सो,प्रशासकीय अधिकारी महांडुळे मॅडम,आरोग्य विभाग प्रमुख तसेच आरोग्य कर्मचारी यांचे उपस्थितीत सोपविणे आली.
यावेळी मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते.संजय यादव यांचे कुटुंबाचे उपजिविकेसाठी अनुकंपा तत्वावर त्यांचे पत्नीस कामावर घेणे बाबत विनंती केली त्यावेळी मा.मुख्य कार्यकारी अधिकारी सो यांनी आम्ही सर्व संजय यादव यांचे कुटुंबासोबत असलेची ग्वाही दिली व संबंधितांना तत्काळ कार्यवाही बाबत सूचना केली.

