shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वारली कलेतून शिक्षक कुडीया जपताहेत लोकसंस्कृती



शिक्षक दिनानिमित्त कुडिया यांचा 'स्नेहबंध'तर्फे सन्मान

प्रतिनिधी : महेश चव्हाण

नगर - ७ /   वारली कला म्हणजे आदिवासी जीवनाचे मूर्तिमंत उदाहरण आहे. या कलेतून त्यांचे जीवन सहजरित्या समोर येते. ही कला महाराष्ट्राचे भूषण आणि लोकसंस्कृती आहे. ती जपण्याचे काम शिक्षक अरविंद कुडिया हे करत आहेत, असे प्रतिपादन अहमदनगर छावणी परिषदेचे सीईओ विक्रांत मोरे यांनी केले. 
शिक्षक दिनानिमित्त स्नेहबंध फाउंडेशनतर्फे छावणी परिषद शाळेतील शिक्षक अरविंद कुडिया यांचा सीईओ विक्रांत मोरे व अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी सन्मानपत्र, शाल व रोप देऊन सन्मान केला. याप्रसंगी वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक रमेश साके, गणेश भोर, हेमंत ढाकेफळकर, शुभम नांगरे आदी उपस्थित होते.  

मोरे म्हणाले, वारली कलेच्या सौंदर्याने नेहमीच लोकांना भुरळ घातली आहे. वारली कलेच्या अद्भुत आविष्काराला रसिकांचे उत्स्फूर्त व भरभरुन प्रेम मिळाले. ही कला जोपासण्याचे काम अरविंद कुडिया हे करत आहेत. त्यांची कला उत्कृष्ट असून त्याची भुरळ ब्रिगेडियर साहेबांनाही पडली आहे. या कलेचा ऐतिहासिक ठेवा पुढील पिढीपर्यंत पोहचावा आणि सामान्य नागरिकांपर्यंत या कलेचा प्रसार व्हावा, यासाठी कुडिया यांचे कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे. 

 वारली कला ही आपली संस्कृती
 
वारली कला ही आपली संस्कृती आहे. ती लोप पावू नये आणि जपली जावी यासाठी शिक्षक कुडिया हे प्रयत्न करत आहेत. ते गेल्या १७/१८ वर्षांपासून विद्यार्थ्यांना वारली कलेचे शिक्षण देत आहे. ही खूप सुंदर लोक कला आहे. महाराष्ट्राचे ती भूषण आहे, असे स्नेहबंधचे अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी सांगितले.
close