shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

स्व. प्रकाश सपकळ युवा फाउंडेशन निमसाखर यांच्या वतीने जि. प. प्रा. शाळा निमसाखर येथील विद्यार्थ्यांना वह्या वाटप.

स्व. प्रकाश सपकळ युवा फाउंडेशन निमसाखर यांच्या वतीने जि. प. प्रा. शाळा निमसाखर येथील विद्यार्थ्यांना वह्या वाटप.

गेली आठ वर्षापासून स्व. प्रकाश सपकळ युवा फाउंडेशन च्या वतीने शालेय साहित्य वाटपाचा उपक्रम.
इंदापूर प्रतिनिधी: निमसाखर येथे स्वर्गीय प्रकाश सपकळ युवा फाउंडेशन निमसाखर यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निमसाखर येथे रक्षाबंधन निमित्त प्रति वर्षाप्रमाणे गेल्या आठ वर्षापासून विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. तसेच एन. ई .एस हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज निमसाखर येथील इयत्ता दहावी बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार स्वर्गीय प्रकाश सपकाळ युवा फाउंडेशन च्या वतीने करण्यात आला.
 यावेळी या कार्यक्रमाचे प्रमुख इंदापूर नगरपालिकेचे माजी नगरसेवक शेखर पाटील, ग्रामपंचायत सदस्य गोरख शेळके, शेखर पानसरे तसेच अरविंद अडसूळ, अतुल भोसले ,मनोज सपकळ, विशाल भोसले, मुख्याध्यापक भुजबळ सर, शिक्षक, विद्यार्थी, पालक उपस्थित होते. 
सामाजिक कार्यकर्ते भारत सपकळ यांनी स्वर्गीय प्रकाश सपकळ युवा फाउंडेशन निमसाखर यांच्या वतीने गेली आठ वर्षापासून विद्यार्थ्यांप्रती असणारे सामाजिक बांधिलकी जपणारे सपकाळ कुटुंब यांच्या या सामाजिक बांधिलकीची विशेष कौतुक यावेळी करण्यात आले.

सामाजिक कार्यकर्ते भारत सपकळ यांच्या या सामाजिक कार्याचे विशेष कौतुक दिव्यांग असणारे आणि इंदापूर तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रात दूरध्वनी द्वारे संपर्क साधणारे निमसाखर युवा ग्रुपचे ॲडमिन गणेश धनवडे यांनी विशेष कौतुक करीत त्यांचे आभार मानले.
close