इंदापूरातील व्यावसायिक, सामाजिक व राजकीय जीवनातील कार्यकर्तृत्ववान युवा नेते म्हणजे शेखर पाटील .
युवा नेते शेखर पाटील यांच्या ३८ व्या अभिष्टचिंतन दिनानिमित्त विशेष लेख.
इंदापूर प्रतिनिधी:इंदापूरातील व्यावसायिक, सामाजिक व राजकीय जीवनातील कार्यकर्तृत्ववान ठसा उमटवणारे युवा नेते म्हणजे इंदापूर शहरातील सुपुत्र अशोकराव वामन पाटील व सौ सुमित्रा पाटील यांचे पुत्र शेखर अशोकराव पाटील होय. ते इंदापूर येथील रहिवासी असून त्यांचा जन्म उत्तर सोलापूर येथील वडाळा या ठिकाणी ७ सप्टेंबर १९८५ साली झाला त्यांचे प्राथमिक शिक्षण इंदापूर नगरपालिका येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर १व २ येथे झाले तर माध्यमिक शिक्षण नारायणदास रामदास हायस्कूल या ठिकाणी झाले. तसेच पुढील उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय इंदापूर या ठिकाणी पूर्ण झाले. यानंतर त्यांनी व्यवसाय क्षेत्रामध्ये पदार्पण केल्यानंतर २००९ सालापासून त्यांनी बांधकाम व्यवसाय निगडित असलेला व्यवसाय स्वामी समर्थ इंटरलॉकिंग सिमेंट हा व्यवसाय चालू केला. कालांतराने त्यांनी स्टोन क्रेशर चा व्यवसाय चालू केला असून या व्यवसायाच्या माध्यमातून रोजगार निर्माण करून रोजगार देण्याचे काम त्यांनी केले. तसेच राजकीय जीवनामध्ये २००७ साली वयाच्या २१ व्या वर्षी सर्वात तरुण नगरसेवक म्हणून निवडून येण्याचा मान मिळवला. त्यांनी २००७ ते २०१२ या कालावधीमध्ये इंदापूर नगरपालिकेचे नगरसेवक म्हणून काम पाहिले तसेच २०१४ ते २०१९ या कालावधीमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे इंदापूर तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले तसेच २०१९,२०२० या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये पुणे जिल्हा युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष म्हणूनही त्यांना काम करण्याची संधी मिळाली. एकंदरीत राजकीय जीवना बरोबर त्यांनी सामाजिक जीवनातही बरीच काम करीत असताना रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, गरजूंना वह्या वाटप, मुस्लिम बांधवांबरोबर सण उत्सव साजरा करणे, सलग दहा वर्ष दहीहंडी चा कार्यक्रम घेणे अशा विविध सामाजिक उपक्रमातून त्यांनी सामाजिक बांधिलकी जपण्याच काम केलं तसेच सामाजिक व राजकीय जीवनाबरोबर त्यांनी व्यवसाय ही वाढवला . युवकांनी राजकारणात येत असताना स्वतःचा व्यवसाय करूनच व्यवसायत पदार्पण करावे तरच राजकारणात यशस्वी होता येते. त्याचे उत्तम उदाहरण युवा नेते शेखर पाटील यांनी भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व त्यांचे चुलते मंगेश पाटील यांची प्रेरणा घेऊन व त्यांच्या मार्गदर्शनाखाली केल्याची त्यांनी सांगितले. सामाजिक राजकीय व व्यावसायिक क्षेत्रात उत्तम असे यश मिळवण्यात यशस्वी झाले. त्यांच्या ३८ व्या अभिष्टचिंतन दिनानिमित्त त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

