प्रतिनिधी अक्षय तोटावार - यवतमाळ
इंडियन मेडिकल असोसिएशन (आय.एम.ए.)
राज्य अध्यक्ष डॉ. रविंद्र कुटे हे सध्या विदर्भ आणी मराठवाडा दौऱ्यावर असुन आज त्यांनी यवतमाळ जिल्ह्यातील आय एम ए च्या पुसद शाखेला भेट दिली.
याप्रसंगी आय एम ए पुसद शाखेने आयोजित केलेल्या स्वागतपर कार्यक्रमात आय.एम.ए. राज्य अध्यक्ष डॉ. रवींद्र कुटे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की,आय एम ए महाराष्ट्राची भिस्त लहान व मध्यम शाखांवर आहे,त्या अनुषंगाने पुढील काळात आणखी काय सुधारणा केल्या पाहिजेत याबाबत त्यांनी सखोल माहिती घेतली तथा पुढे करण्यात येणाऱ्या विविध उपाययोजना यावर मार्गदर्शन केले.
यावेळी व्यासपीठावर डॉ. उमेश रेवणवार, डॉ. मिलिंद तगलपळेवार, डॉ.आनंद कोमावार, डॉ. सौ. मंजुषा तगलपळेवार आदि उपस्थित होते.
आय एम ए पुसद शाखा जरी लहान असली तरी या शाखेने स्वत:चा अद्ययावत हॉल उभारला आहे हे विशेष, आय एम ए ची ताकद पुसदसारख्या शाखेवर असून या शाखेला डॉ. उमेश रेवणवार सारखा उपाध्यक्ष होऊन गेले.त्यांच्या मार्गदर्शनाने पुसद शाखेने चांगली प्रगती केली आहे.
आय एम ए राज्य अध्यक्ष डॉ.कुटे यांच्या दौऱ्याचे डॉ.उमेश रेवणवार यांनी यशस्वीपणे नियोजन केले होते.
उमरखेड येथे डॉ. यादवराव राउत, डॉ. बंग यांनी पाच नुतन सदस्याना आय एम ए मध्ये सामील केले. तसेच डिगरस, आरणी, पुसद या शाखांना डॉ. रवींद्र कुटे यांनी भेट दिल्या.
*संकलन:*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*

