shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गणपती बाप्पा भरपूर पाऊस पडू देबळीराजा सुखी होवू दे - सचीन गुजर

गणपती बाप्पाची कृपा आहेच अशीच
राहु दे - डॉ. बसवराज शिवपुजे

*श्रीक्षेत्र गणेशखिंड येथील वरद गजानन
उत्सव सोहळ्यास धर्मध्वजारोहनाने आरंभ

भोकर प्रतिनिधी:
‘गणपती बाप्पा भरपूर पाऊस पडू दे, बळी राजा सुखी होवू द्या’, सध्या उभी असलेली पिकं शेतकर्‍यांच्या पदरात पडू दे, त्याच बरोबर पुढचे पिके हि चांगली होवू दे, अशी साकडे श्रीरामपूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समीतीचे संचालक व श्रीक्षेत्र गणेशखिंड देवस्थानचे विश्वस्त सचीन गुजर यांनी श्रीक्षेत्र गणेशखिंड येथील वरद गजाननाला घातले.


परीसरातील पंचक्रोषीचे श्रद्धस्थान व नवसाला पावणारे जागृत देवस्थान म्हणून ख्याती असलेले श्रीक्षेत्र गणेशखिंड येथील वरद गजानन उत्सव सोहळ्याच्या आरंभ धर्मध्वजारोहन सोहळ्यात ते बोलत होते. गणशोत्सवानिमीत्ताने श्रीगणेश देवस्थान ट्रस्ट आयोजीत ‘वरद गजानन उत्सव सोहळा’ व त्या निमीत्ताने आयोजीत ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरीनाम सप्ताहाचे शुभारंभ प्रसंगी आयोजीत धर्मध्वजारोहन सोहळ्या प्रसंगी ते बोलत होते.
श्रीरामपूर येथील उपपिभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांचे हस्ते या धर्मध्वजाचे पुजन करून ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, देवस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब ओझा, सचीव बजरंग दरंदले, विश्वस्त किसन महाराज पवार, सचीन गुजर, कृष्णा महाराज वाघुले, संतोष महाराज चौधरी, संदिप महाराज जाधव, अशोकचे माजी उपाध्यक्ष भाऊसाहेब उंडे, अशोकचे संचालक योगेश विटनोर, कृषी उत्पन्न बाजार समीतीचे संचालक दशरथ पिसे, सरपंच अमोल गुजर, सरपंच ज्ञानेश्वर बिडगर, शेतकरी संघटनेचे भास्करराव तुवर, पत्रकार संघाचे जिल्हा सचीव पत्रकार चंद्रकांत झुरंगे आदि मान्यवर उपस्थीत होते.
श्रीक्षेत्र गणेशखिंड देवस्थान हे जागरूक देवस्थान आहे तसेच श्रीक्षेत्र देवगडचे मठाधिपती गुरूवर्य महंत भास्करगीरीजी महाराज यांचे श्रद्धास्थान असलेले देवस्थान आहे. संकट मोचक गणपती बाप्पा अशी या देवस्थानची ख्याती आहे. सर्वत्र किती ही दुष्काळ पडला, बिकट परीस्थीती तयार झाली तरी ही आमच्या परीसरावर संकट येत नाही अन् आलेच तरी येथील वरद गजाननाचे कृपाशिर्वादाने परीसरातील १४ ते १५ गावांना कधीही त्याची झळ बसत नाही, आमच्या परीसरातील पिकं जगतात हा आमचा भाविकांचा अनुभव असल्याचे यावेळी सचीन गुजर यांनी सांगीतले.

आपल्या या परीसरावर गणपती बाप्पाची कृपा आहेच ती अशीच राहो अशी विनंती यावेळी श्रीरामपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.बसवराज शिवपुजे यांनी केली. परीसरातील श्री. सोमनाथ मोटे व सौ. स्नेहल सोमनाथ मोटे या दाम्पत्याचे हस्ते विधीवत पुजन करून येथील उत्सव सोहळ्याचा आरंभ करण्यात आला. यावेळी कारेगाव येथील द्वारकानाथ जोशी यांनी पौराहीत्य केले. यावेळी मान्यवरांचे हस्ते ज्ञानेश्वरी ग्रंथ, टाळ, पक्वाज व विना यांचे पुजन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व प्रास्ताविक बजरंग दरंदले यांनी केले तर कल्याणराव लकडे यांनी आभार मानले.
यावेळी विश्वस्त मंडळातील राधोजी मोटे, दत्तात्रय पवार, निलेश ओझा, सर्जेराव गायकवाड आदिंसह पोलीस पाटील दिनकर गायकवाड, उपसरपंच ज्ञानेश्वर लकडे, शनैश्वर पवार, शिवाजी पवार, रामभाऊ कवडे, काशिनाथ गोराणे बाबा, साहेबराव पटारे, संजय गुजर, नानासाहेब पारखे, बबन उंडे, सचीन राऊत, शिवाजी पटारे, सोमनाथ पारखे, प्रताप गुजर, मच्छींद्र भालके, पोपट पटारे, रामदास वाकडे, शंकर गाढे, भिमभाऊ पवार, पो.ना अनिल शेंगाळे आदिंसह मोठा जनसमुदाय उपस्थीत होता.
*सहयोगी:
पत्रकार चंद्रकांत झुरंगे -भोकर 
*संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 
9561174111
close