shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

"मेरी मिट्टी मेरा देश" अभियान अंतर्गत माजी सैनिक, पोलीस अधिकारी यांची अकोले पो. स्टे.पोलीस निरीक्षक विजयजी करे यांचे हस्ते सत्कार ..!

अकोले ( प्रतिनिधी ) ,:- तालुक्यातील कळस बू येथे "मेरी मिट्टी मेरा देश" अभियान अंतर्गत माजी सैनिक, पोलीस अधिकारी यांची ढोल ताशाच्या  गजरात मिरवणूक काढून अकोले पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विजयजी करे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.   


           कळस चे सरपंच राजेंद्र गवांदे यांच्या मार्गदर्शना खाली ग्रामपंचायत च्या वतीने 'मेरी मिट्टी मेरा देश' या अभियाना अंतर्गत अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. यामध्ये माजी सैनिक विजय वाकचौरे, गोरक्षनाथ वाकचौरे, मनोहर हुलवळे, विठ्ठल भुसारी, सचिन भुसारी, शिवाजी झोडगे, निवृत्ती वाकचौरे, वीर पत्नी सुंदर कानवडे, सेवा निवृत्त पोलीस उपनिरीक्षक शिवाजी वाकचौरे, विलास गवांदे यांचा सन्मान करण्यात आला. मेरी मिट्टी मेरा देश चा जिल्हा संयोजक म्हणून कळस गावचे सुपुत्र भाऊसाहेब वाकचौरे, आदर्श कामगार पोलीस पाटील गोपीनाथ ढगे यांचा देखील  सन्मान करण्यात आला.

          सन्मान सोहळ्याचे निमित्ताने पोलीस निरीक्षक विजय करे यांनी शालेय विद्यार्थ्यांशी विशेष संवाद साधला. प्रामाणिकपणाचे, शिस्तीचे  दाखले दिले. ध्येय,चिकाटी असली की गरिबी आडवी येत नाही त्यासाठी जिद्द असावी लागते, मी गरिबी अनुभवली आहे. आई वडिलांचे उपकार विसरता कामा नये. तीच शिदोरी माझ्या कामा आली. अन्याय कधीही सहन करायचा नाही. मुलींना देखील आत्मनिर्भर होण्यासाठी कायदेविषयक मार्गदर्शन केले.

      कळस गावात विविध ७५ वृक्षांची अमृत वाटिका करण्यात आली. स्वातंत्र सेनानी यांच्या स्मृती शिलाफलक लावण्यात आला. या वृक्षांना माती माजी सैनिक, विध्यार्थी यांचे हस्ते माती अर्पण करण्यात आली.


       यावेळी ह.भ.प. गणेश महाराज वाकचौरे, ग्रामसेवक कचरू भोर, यांची भाषणे झाली. शिक्षिका संगीता दिघे यांनी पंचप्रण ची शपथ दिली. आभार शिक्षक मच्छिन्द्र साळुंके यांनी मानले. यावेळी ग्रामपंचायत उपसरपंच केतन वाकचौरे, सदस्य ज्ञानेश्वर वाकचौरे, ह.भ.प. देवराम महाराज वाकचौरे, डी. टी. वाकचौरे, यादवराव वाकचौरे,  शांताराम वाकचौरे, रावसाहेब वाकचौरे, कळसेश्वर विद्यालय च्या मुख्याध्यापिका संगीता शेलार, जिल्हा परिषद केंद्र शाळा चे मुख्याध्यापक काशिनाथ आंधळे आदी उपस्थित होते.


            विध्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा करत, डोक्यावर कलस घेऊन आपल्या मातीची सवाद्य  मिरवणूक काढली. कळस ची माती दिल्ली नेण्यासाठी या अभियाना चे संयोजक भाऊसाहेब वाकचौरे यांचे कडे सुपूर्द करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी संजय सोनवणे, माधव वाकचौरे, शंकर वाघमारे यांनी विशेष प्रयत्न केले . 
कोट:- कळस गावचे सरपंच राजेंद्र गवांदे ,उपसरपंच केतन वाकचौरे व सदस्यांनी दुतर्फा वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धन करण्यासाठी लोकसहभागातून केलेल्या कार्याचा सर्वांनीच गौरव केला.
close