shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

झाले बहू, होतील बहूपरी हया सम हाचि...!


अनेक झाले, आणि अनेक होतील, पण नरेंद्र मोदीजी सारखा धुरंधर,प्रखर राष्ट्रवादी पंतप्रधान अजून तरी देशात झाला नाही,अगर होणार ही नाही,अश्या ह्या महान नेत्याचा आज 17 सप्टेंबर हा आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी ह्यांचा 73 वा वाढदिवस त्यानिमित्ताने थोडक्यात आढावा.


देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 17 सप्टेंबर 1950 रोजी अश्या या महान नेत्याचा जन्म गुजरात मध्ये गरीब कुटुंबात झाला, लहान वयात गरिबीची झळा सोसून सामन्याचे दुःख, हालअपेष्टा जवळून बघुन आपले जीवन राष्ट्रासाठी अर्पण करण्याचे उदात्त हेतूने भारतभर "जम्मू कश्मीर ते कन्याकुमारी " देशाची परिक्रमा करून, भारतीय जनता पार्टीचे माध्यमातून कार्यकर्ता ते सर्वोत्तम नेता असा जीवन प्रवास करणारे स्व. पंतप्रधान अटलजी बिहारी वाजपेयी नंतर दुसरे पंतप्रधान
नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारतीय जनता पक्षाचे (BJP) नेते आणि मे २६ २०१४ पासून स्वतंत्र भारताचे १५ वे पंतप्रधान आहेत. ते ऑक्टोबर ७, २००१ पासून मे २२, २०१४ पर्यंत गुजरात राज्याचे मुख्यमंत्री होते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर जन्मलेले ते भारताचे पहिले पंतप्रधान आहेत. भाजपच्या गुजरात विधानसभेच्या २००२ ते २०१२ च्या तसेच १९९५च्या व १९९८च्या निवडणूक विजयांमध्ये मोदींचे मोठे योगदान होते. ते २००१ च्या ऑक्टोबर मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री झाले व त्यानंतर सरळ ४ विधानसभा जिंकत मोदींनी मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार पाहिला. २००९ लोकसभा निवडणुकीसाठीही ते भाजपचे कूटनीतिज्ञ होते.

गुजरात भूकंप २००१, (भुजमधील भूकंप) नंतर, गुजरातमधील तत्कालीन मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांच्या आरोग्याच्या बिघडलेल्या आणि कमकुवत इमेजमुळे नरेंद्र मोदी यांना २००१ मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले होते. मोदी लवकरच विधानसभेवर निवडून गेले.
मोदी हे हिंदुत्ववादी विचारसरणीचे नेते आहेत व संघाचे स्वयंसेवक आहेत. मोदी हे गुजरात राज्याच्या विकासासाठी ओळखले जातात. त्यांच्या अर्थकारणाची प्रशंसा सर्वत्र केली जाते.

मोदींनी २६ में २०१४ रोजी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. या पदावर पोहोचणारे रा.स्व.संघाचे ते पहिले प्रचारक तर दुसरे स्वयंसेवक होत. ते भारताचे अतिशय प्रभावी पंतप्रधान आहेत. जनतेशी थेट संवाद करणारे ते पहिलेच पंतप्रधान आहेत. भारतात आमूलाग्र बदल करण्याचे स्वप्न ते पुरेसे योगदान देऊन सार्थ करत आहेत.

वडनगरमधील गुजराती कुटुंबात जन्मलेल्या मोदींनी आपल्या वडिलांना बालपणात चहा विकण्यास मदत केली आणि नंतर स्वत:चे स्टॉलही चालवले. वयाच्या आठव्या वर्षी ते आरएसएसमध्ये सामील झाले, ज्यांच्याशी ते दीर्घकाळ संबंधित होते. पदवीनंतर त्यांनी आपले घर सोडले. मोदींनी दोन वर्षे भारतभर प्रवास केला आणि अनेक धार्मिक केंद्रांना भेटी दिल्या. १९७९ किंवा १९७० ते गुजरातमध्ये परतले आणि अहमदाबादला गेले. १९७१ मध्ये ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्ण-वेळ कार्यकर्ते झाले. १९७५ मध्ये आपत्कालीन परिस्थितीत त्यांना काही काळ लपावे लागले. १९८५ मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि २००१ पर्यंत त्यांनी पक्षाच्या पदानुक्रमात अनेक पदे भूषवली, तेथून हळूहळू ते भाजपाच्या सचिव पदावर गेले.

संघाचे प्रचारक ते भाजपाचे राष्ट्रीय महासचिव, गुजरात मध्ये 1990 नंतर राजकारणात सक्रीय होऊन सलग तीन वेळा मुख्यमंत्री होण्याचा विक्रम आणि गुजरातला देशात विकासाचे पहिल्या क्रमांकावर नेण्यासाठी प्रयत्न करणारे एकमेव नेते, बोलून नाही करून दाखवणारा माणूस हीच त्यांची ख्याती, अमेरिकेचे माजी राष्ट्रअध्यक्ष बराक ओबामा ह्यानी Change is comning now अशी घोषणा देऊन एक कृष्णवर्णीय माणूस इतक्या मोठ्या देशाचा पंतप्रधान होऊ शकतो हे दाखवून दिले, पण मोदीजी नी सुद्धा एक गरिबीचा मुलगा देशाचा पंतप्रधान होऊन त्याचे कार्यामुळे आतंरराष्ट्रीय पातळीवर देशाची प्रगती आणि प्रतिष्ठा ह्या विचारात घेऊन आपल्या धोरणांनी देशाला जगात वेगळे स्थान निर्माण करण्याचे काम करणारे एकमेव पंतप्रधान म्हणून त्याचा गौरव होतोय.चीन,पाकिस्तान सारख्या शत्रूची नाकेबंदी करून देशाला जगाच्या नकाशात वेगळे स्थान निर्माण करून देणारे जागतिक नेते म्हणून त्याचा गौरव करण्यात आला
देशातील गरिबी हटाव, शेतकऱ्याना सन्मान म्हणून 6000 रुपये सरसकट देण्याचे काम भारत देशाचे इतिहासात प्रथमतः करणारे एकमेव नेते,काश्मीर बाबत असेलेले 370 कलम हटून अनागोदी बंद करून कश्मीरचा विकास करण्यासाठी मोठे पाऊल टाकले, NRC सारखा कायदा पास करून बांगलादेशी घुसखोरी रोखण्यासाठी कडक पाऊल उचलले, मुद्रालोण मार्फत कोट्यवधी लोकांचे परिवार स्वतःचे पायावर उभे करण्यासाठी प्रयत्न यशस्वी केला, पंतप्रधान जीवदायी योजना मार्फत कोट्यवधी गरीबाना मोफत आरोग्याच्या सुविधा, बचत गटांना प्राधान्य देऊन स्त्री सबलीकरण, सुकन्या योजना, स्त्री शिक्षण,जनधन योजनेतून गरिबीच्या बँक खात्यात थेट मदत, ते आधार कायदा मंजूर करून हजारो कोटी रुपयांचा शासकिय निधीचा भ्रष्टाचार थांबवला, गरिबांना मोफत गॅस,आत्मनिर्भर भारत योजनेत स्वदेशी मालाचा वापर, स्किल इंडिया मार्फत उद्योग निर्मिती, कोट्यवधी घरे बांधून नवा भारत देश उभारणीचे काम अश्या अनेक योजना देशाला सदृढ ,सशक्त बनवण्यासाठी ज्यांनी केले ते एकमेव ,अजोड व्यक्तिमत्त्व पंतप्रधान मा नरेंद्र मोदीजी ह्यांना वाढदिवसाच्या निमित्त लाख लाख शुभेच्छा त्यांना उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
close