shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शेतकरी राजा, युवा वर्ग, विद्यार्थी, महिलांचे सर्वांचे प्रश्न मार्गी लागो - तेजपृथ्वी ग्रुपच्या संस्थापक अध्यक्ष अनिताताई खरात यांनी घातले गणेशाच्या चरणी साकडे.

शेतकरी राजा, युवा वर्ग, विद्यार्थी, महिलांचे सर्वांचे प्रश्न मार्गी लागो -  तेजपृथ्वी ग्रुपच्या संस्थापक अध्यक्ष अनिताताई खरात यांनी  घातले  गणेशाच्या चरणी साकडे.

 गणेश विसर्जनासाठी सुंदर नियोजन केल्याबद्दल नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांचा तेजपृथ्वी ग्रुप कडून सन्मान.
इंदापूर प्रतिनिधी: आज अनंत चतुर्थीच्या दिवशी तेजपृथ्वी ग्रूपच्या वतीने इंदापूर शहरातील बहुसंख्य गणेशोत्सव मंडळांना भेटी देऊन शुभेच्छा देण्यात आल्या असून गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन  सर्व मायबाप जनतेस सुख समृद्धी आनंद मिळो,शेतकरी, राजा युवा वर्ग, विद्यार्थी, महिला यांचे सर्वांचे प्रश्न मार्गी लागो अशी गणेशाच्या चरणी तेजपृथ्वी ग्रुपच्या संस्थापक अध्यक्ष अनिताताई खरात यांनी साकडे घातले.                        तसेच यावेळी नवीन इंदापूर नगर परिषदेच्या अति समोर अतिशय सुंदर आणि शिस्तबद्ध असे गणेश विसर्जनासाठी नियोजन केले असून त्याबद्दल नगरपालिकेचे मुख्याधिकारी व नगरपालिकेचे सर्व पदाधिकारी कर्मचारी यांचा सन्मान ही तेजपृथ्वी ग्रुप कडून करण्यात आला.

यावेळी गणेश  शिंगाडे ,सद्दाम  बागवान ,विजय पवार, सोनू सय्यद, अमानत बागवान व इतर मान्यवर उपस्थित होते.
close