shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

खासदार डॉ सुजय दादा विखे पाटील यांचा रुक्मिणीची प्रतिमा व हार शाल गुच्छ देऊन सत्कार


शिर्डी प्रतिनिधी : ( संजय महाजन )
 सामाजिक बातमी 

मा.नामदार राधाकृष्ण विखे पाटील तसेच मा.खासदार डॉ.सुजय (दादा)विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डीतील महिलांना श्रावण मास महिन्याच्या निमित्ताने श्री क्षेत्र पंढरपूर व तुळजापूर यात्रेचे आयोजन करण्यात आले या दोन दिवसीय यात्रेसाठी शिर्डीतील प्रभाग:-३मधील गायके वस्ती,साई पंढरीनगर,माऊली नगर,शेळके-शिंदे वस्ती,भागातील महिलांनी सहभाग घेतला.अत्यंत उत्कृष्ट नियोजन बद्ध पद्धतीने यात्रा आहे.अतिशय सुखकर प्रवास,प्रवासात ठिक ठिकाणी स्वादिष्ट नाष्टा,भोजनाची व्यवस्था मुक्कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षेची संपूर्ण काळजी,रस्त्यात ठिक ठिकाणी प्रथमोपचार कक्ष,मंदिरात दर्शन करते वेळी प्रत्यक्ष थांबून महिलांची काळजी घेणारा स्टाफ यंत्रणा
यात्रेत प्रत्येक गोष्टीचे परिपूर्ण नियोजन होते...
हे फक्त आणि फक्त आ.खासदार डॉ.सुजय दादाच करू शकतात.

 यावेळी या सर्व महिलांनी  खासदार डॉ.सुजय दादा विखे पाटील यांचा विठ्ठल रुक्मिणी ची प्रतिमा व हार शॉल गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच शिव पुराण कथा शिर्डीत आयोजित करण्यात यावी अशीही मागणी महिलांच्या वतीने करण्यात आली या वेळी सरीता अशोक गायके,माया शंकरराव गायके, सुनंदा गोविंद मगर,मनीषा संजय घोडके, सुप्रिया दीपक गायके,मनीषा भागवत चोळके,वेदिका भानुदास गायके,भारती विजय चोळके, आश्विनी धनंजय गायके,कल्पना करण भुजबळ तसेच माजी प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते व माजी नगरसेवक अशोक भाऊसाहेब गायके,मयूर दांगट, बबनराव गायके उपस्थित राहून धन्यवाद देत सुजय दादांचे आभार मानले.
close