शिर्डी येथे सर्व धर्मीय वधू वर मेळावा
शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन )
सामाजिक बातमी
श्री साईबाबा सेवा संस्थान, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्स , अहमदनगर जिल्हा तेली समाज महासभा व शिर्डी ग्रामस्थ आयोजित राज्यस्तरीय सर्व जातीय वधु वर पालक परिचय मेळावा २०२३ च्या वधु वर नोंदणी अर्ज व जाहिरात तथा माहिती पत्रकाचे अनावरण श्री खंडोबा देवस्थान मंदिर शिर्डी येथे सर्व जातीय समाजातील समाज सेवक व प्रतिनिधी यांना आमंत्रित करून मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला
शिर्डी शहरात प्रथमच असा भव्य दिव्य राज्यस्तरीय वधुवर परिचय मेळावा हा रविवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी शिर्डी येथे आयोजित करण्यात आला असून हा मेळावा सर्व स्तरातील समाज बांधवांसाठी खुला आहे, हा मेळावा तरुणांसाठी आधारवड असून यामाध्यमातून अनेक सामाजिक प्रश्न सुटण्यास मदत होईल असे अॅड.विक्रांत वाघचौरे यांनी सांगितले ,
समितीच्या वतीने उपस्थित सर्व समाजाच्या प्रतिनिधींना मेळावा विषयी माहिती देण्यात आली व पुढील काळात वधु वर यांकडून फार्म भरून घेण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.
मेळावा यशस्वी होण्यासाठी शिर्डी येथील ग्रामस्थ यशस्वी प्रयत्न करेन ही भुमिका आजच्या बैठकीत सर्वानुमते घेण्यात आली.
यावेळी श्री खंडोबा व श्री साईनाथ महाराजांच्या चरणी जेष्ठ मार्गदर्शक किशोर बोरावके, सतीश गंगवाल, दीपक वारुळे, यशवंत वाघचौरे, अॅड.नंदू साळुंखे,प्रभाकर कोते,तुकाराम गोंदकर,गजानन आण्णा शेर्वेकर,अजय नागरे, सुधीर शिंदे या सर्व समाजसेवकांच्या हस्ते अर्पण करण्यात आला व साई नामाचा जयघोष करून वधु वर पालक परिचय मेळावा अर्जाचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी ॲड.अविनाश शेजवळ, सचिन चौगुले, सुरेश आरणे, राकेश भोकरे, गणेश वाघचौरे. सचिन लोखंडे, अॅड.अमित महाले, गणेश खैरे, रविद्रं कोलकर, अमोल बाणाईत, शंकर कुऱ्हाडे, दिलीप राऊत, सागर सोपारकर, रोहीत सोळंकी, लक्ष्मण कोतकर, निलेश नागरे, दिलीप चौधरी आदी शिर्डी ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

