shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्री साईबाबा संस्थान शिर्डी येथील आरोग्य विभागातील कर्मचारी संजय यादव यांच्या निधनामुळे त्यांच्या कुंटुबाला आर्थिक मदत



शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
 सामाजिक बातमी 

श्री साईबाबा संस्थान मधील आरोग्य विभाग कर्मचारी संजय यादव यांचे काही महिन्यांपूर्वी अकस्मात निधन झाले व त्यांच्या पश्चात पत्नी आणि चार मुली दोन मुले असा परिवार होता मात्र घरातील कर्त्या पुरुषाच्या जाण्याने सदरील कुटुंब उघड्यावर पडले घरची परिस्थिती अत्यंत बिकट...चार चार मुली घरात शिक्षणाचा खर्च...इतर खर्च मोठा आणि वडिलांचे छत्र हरपले ...त्यातच घरातील कमावणारा व्यक्तीचं गेल्याने...घर गाडा हाकायचा कसा अश्या  विवंचनेत यादव कुटुंब असताना..शिर्डीतील अग्रणी वृत्तवाहिनी os news चे संपादक राजेंद्र बनकर आणि प्रतिनिधी देविदास खरात यांनी या कुटुंबाची थेट संगमनेर तालुक्यातील कौठे कमळेश्वर येथे भेट घेत त्यांची विदारक परिस्थिती जगासमोर आणली व त्यानंतर साई न्यूज ने सदरील वृत्त प्रसारित करत सदर कुटुंबाला मदतीची गरज असल्याचे आवाहन केले असता श्री साईबाबा संस्थान कर्मचारी विठ्ठल पवार, रामा गागरे आणि इतर सहकाऱ्यांनी संस्थानच्या सर्व विभागातील कर्मचाऱ्यांना मदतीची हाक दिली असता त्यांच्या हाकेला भरभरून प्रतिसाद देत कर्मचारी बांधवांनी 41 हजार रुपयांची मदत गोळा केली व संरक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सुद्धा आपली 20 हजार मदत कुटुंबाला रक्षा बंधनाच्या दिवशी सुपूर्त केली व काल 41 हजारांचा चेक यादव कुटुंबीयांना त्यांच्या घरी जात कौठे कमळेश्वर. चे सरपंच नवनाथ जोंधळे यांच्या हस्ते सुपूर्त केली

यावेळी विठ्ठल पवार यांनी साईबाबा संस्थानच्या सर्व दानशूर सहकारी कर्मचाऱ्यांचे आभार मानले व os news Ani sai news च्या आवाहनाला प्रतिसाद देत या कुटुंबाला   जी मदत मिळाली त्यासाठी दोन्ही प्रसार माध्यमांचे आभार मानण्यात आले
close