*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मंडलिकवस्ती येथे आजी आजोबा दिवस उत्साहात साजरा.
इंदापूर प्रतिनिधी: शनिवार दि.16/9/2023 रोजी आजी-आजोबा दिवस' केंद्रप्रमुख मारुती सुपूते व शाळेचे मुख्याध्यापक यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या आजी-आजोबांना निमंत्रित करण्यात आले होते. या प्रसंगी उपस्थित आजी-आजोबांचे औक्षण करुन ,फुलांच्या पाकळ्याची उधळण करून पारंपरिक लोककला लेझीमच्या तालावर जल्लोषात स्वागत करण्यात आले.मोठ्या संख्येने आजी आजोबांनी कार्यक्रमासाठी उपस्थिती दर्शवली. सरस्वती पूजन करून सौ.अश्विनी साळुंखे मँडम च्या मार्गदर्शनाखाली हार्मोनियमच्या तालावर विद्यार्थ्यीनींनी ईशस्तन व स्वागत गीत सादर करून आजी- आजोबांचे स्वागत केले.आजीआजोबांचे त्यांच्या नातवंडांनी औक्षण केले, पाद्यपूजा केली.नमस्कार केला. आजी-आजोबांनीही मनभरुन आपल्या नातवंडांना शुभ आशीर्वाद व सदिच्छा दिल्या.शाळेच्या शाळाप्रमुख सौ.माधवी शेटे मँडम यांनी आजी आजोबा एक संस्कार रूपी ठेवा या बाबत मार्गदर्शन केले. सौ.प्रेमिला घोळवे मँडम यांनी देखील आजी-आजोबा व नातवंडांचा जिव्हाळा याबाबत हितगुज केले .
श्री.चंद्रकांत बनकर सर व श्री.आप्पासाहेब घोळवे सर यांनी आजी -आजोबांची संगीत खुर्ची स्पर्धा घेतली. यावेळी आजी -आजोबांच्या चेहऱ्यावरील आनंद न्याहाळण्यासारखा होता.विद्यार्थ्यांना तर खूप हुरूप आला होता.सुमारे दीडशे ते दोनशे आजी आजोबांच्या जोड्या या वेळी उपस्थित होत्या. काही आजी आजोबांनी आपले मनोगत व्यक्त केले. अनुभव सांगितले.कार्यक्रमासाठी ,श्री.बनकर सर ,श्री.घोळवे सर सौ.ऋतुजा सपकळ व सौ.सुप्रिया सपकळ या शिक्षिकांचे सहकार्य मिळाले .यावेळी ग्रामपंचायत सदस्य श्री.ज्ञानेश्वर राऊत ,शाळा व्यवस्थापन समिती च्या अध्यक्षा सौ.वर्षा मोरे,श्री.अंकुश मोरे, श्री.सचिन गायकवाड, सौ.प्राची विनायक राऊत,सौ शितल निलेश राऊत,श्री अजित यादव ,श्री.महात उपस्थित होते.गुणवत्तेच्या बाबतीत अव्वल असलेली शाळा उपक्रमांच्या बाबतीतही अव्वल ठरत आहे.हे पुन्हा एकदा या कार्यक्रमाच्या निमित्ताने सिद्ध झाले.

