shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत एन.ई.एस. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय निमसाखर १९ वयोगटातील मुलींचा संघ ठरला विजेता.

तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत एन.ई.एस. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय निमसाखर १९ वयोगटातील मुलींचा संघ  ठरला  विजेता.
इंदापूर प्रतिनिधी: निमसाखर एज्युकेशन सोसायटीचे एन.ई.एस. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय निमसाखर (ता - इंदापूर)  येथे दिनांक १५ व १६ सप्टेंबर रोजी तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सुमारे तालुक्याच्या विविध शाळांमधून १०६ संघांनी नोंदणी केली होती. त्यामध्ये एन.ई.एस. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय निमसाखर विद्यालयातील १७ वयोगटातील मुलीचा संघ उपविजेता ठरला तर १९ वयोगटातील मुलींचा संघ विजेता ठरला. १९ वयोगटातील मुलींच्या संघाची निवड जिल्हास्तरीय कबड्डीसाठी झालेली आहे. तालुकास्तर कबड्डी स्पर्धेच्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम  विद्यालयाच्या मैदानावरआयोजित करण्यात आला. त्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून वालचंदनगर पोलीस स्टेशनचे  पोलीस अधिकारी खंदारे , मुंबई हायकोर्टचे नामवंत वकील संजीवन कदम , तालुका क्रीडा संघटनेचे अध्यक्ष झोळसर, तर पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सदस्य नामवंत पंच दत्तात्रेय हेगडकर सर व त्यांचे सहकारी याप्रसंगी उपस्थित होते. 
निमसाखर गावचे आजी-माजी खेळाडू देखील बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. त्यावेळेस संस्थेचे विद्यमान सचिव धनंजय सूर्यकांत रणवरे यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा सन्मान करण्यात आला यावेळी  ते म्हणाले की,इंदापूर तालुक्यातील सर्व क्रीडा शिक्षक क्रीडा प्रेमी खेळाडू यांनी गेले दोन दिवस खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं पंच,गुणलेखक, टाईम टिपर विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी देखील या स्पर्धा पार पाडण्यासाठी खूप प्रयत्न केले आणि आपल्या विद्यालयातील खेळाडूंनी इंदापूर तालुक्यामध्ये एन ई.एस. हायस्कूल व जुनिअर कॉलेज चा नावलौकिक उंचावला त्याबद्दल सर्वांचे मनापासून अभिनंदन.विजेत्या संघांना पुढील स्पर्धेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
 पोलीस अधिकारी खंदारे  यांनी  सर्व खेळाडूंना जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी  शुभेच्छा दिल्या.  राष्ट्रीय पंच दत्तात्रय हेगडकर व झोळ सर यांनी देखील विद्यालयातील सर्व व्यवस्था पाहून खूप सर्वांचे कौतुक केले.त्यावेळी विद्यालयाचे प्राचार्य चंद्रकांत रणवरे सर म्हणाले की, इंदापूर तालुक्यातील सर्वच क्रीडा शिक्षकांनी पंचांनी खेळाडूंनी या सर्व स्पर्धा पार पाडण्यासाठी खूप मोलाचे सहकार्य केले. त्यांनी देखील सर्वांचेच आभार मानले व विजेत्या संघाला जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी खूप शुभेच्छा दिल्या. कनिष्ठ विभागातील विभाग प्रमुख चंद्रकांत बोंद्रे सर, व विद्यालयाचे पर्यवेक्षक मधुकर खरात सर यांनी देखील सर्वांना मार्गदर्शन केले. 

 कबड्डी सामने व्यवस्थित रित्या पार पाडण्यात आले.यासाठी विद्यालयातील सर्व क्रीडा शिक्षक व  शिक्षिकानीसर्व खेळाडूंसाठी खूप मार्गदर्शन केले. दत्तात्रय पोपटराव ढोबळे यांनी संघाचे कोच म्हणून अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडली.
close