पिडीसी बँकेच्या वतीने जय भवानी वि .का. सह. विकास सोसायटी पंधारवाडीस पुरस्कार व कायम स्वरूपी ढाल देऊन केले सन्मानित.
इंदापूर प्रतिनिधी: पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुणे बॅँकेची वार्षिक सर्व साधारण सभा दि.१८ सप्टेंबर २०२३ रोजी अल्प बचत भवन पुणे येथे पार पडली. या कार्यक्रमाप्रसंगी बँकेच्या वतीने उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्थांचा जिल्हयातून प्रथम, द्वितीय व तृतीय असे पुरस्कार देण्यात आले. तसेच प्रत्येक तालुक्यातील एका संस्थेला पुरस्कार देण्यात येतो त्यापैकी इंदापूर तालुक्यातील जय भवानी विविध कार्यकारी सहकारी विकास सोसायटी पंधारवाडी या संस्थेने बँक पातळीवर 100% वसुली व 10%डिव्हिडंड वाटप केल्याने
या संस्थेला पुरस्कार व कायम स्वरूपी ढाल देऊन देऊन सन्मान करण्यात आला . हा सन्मान आमदार दत्तात्रय भरणे, बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे व इंदापूर तालुका विभागीय अधीकारी थोरात , वडापुरी शाखा इन्स्पेक्टर जगदाळे यांचे हस्ते ढाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.
यावेळी संस्थेचे चेअरमन राजेंद्र खंडेराव नलवडे, व्हा. चेअरमन शिवाजी साहेबराव भोसले, पंधारवाडी गावचे सरपंच दिगांबर दशरथ निंबाळकर, रमेश जगताप, सुधीर निंबाळकर, सुनिल राऊत, विठ्ठल शेंबडे, दीपक रणवरे , तानाजी नलवडे, बाळासाहेब नलवडे व संस्थेचे सचिव नाना चंद्रकांत बोराटे उपस्थित होते.

