इंदापूर पोलीस स्टेशन येथे इंदापूर पोलीस स्टेशन आयोजित श्री गणराया अवार्ड २०२२ चा वितरण सोहळा संपन्न.
प्रथम क्रमांकाचा मान मिळवला शिवराज गणेश उत्सव मित्र मंडई.
इंदापूर प्रतिनिधी: दिनांक १६ सप्टेंबर २०२३ रोजी इंदापूर पोलीस स्टेशन येथे इंदापूर पोलीस स्टेशन आयोजित श्री गणराया अवार्ड २०२२ चा वितरण सोहळा सायंकाळी इंदापूर तालुक्याचे तहसीलदार श्रीकांत पाटील, इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत गणराया अवार्ड समितीच्या वतीने गेल्या २०२२ मधील समितीच्या नियम व अटीनुसार प्रथम द्वितीय तृतीय आणि उत्तेजनार्थ अशी बक्षिसे इंदापूर शहरातील गणेश मंडळाला सामाजिक बांधिलकी जपून अतिशय प्रबोधनात्मक उत्तम असे उपक्रम राबवल्याबद्दल देण्यात आले .
यामध्ये प्रथम क्र. शिवराज गणेश उत्सव मित्र मंडळ मंडई, द्वितीय नरसिंह गणेश मित्र मंडळ, तृतीय राधिका गणेश मित्र मंडळ, तृतीय जय भवानी मित्र मंडळ, उत्तेजनार्थ साईनगर गणेश उत्सव मंडळ ,उत्तेजनार्थ जागृती प्रतिष्ठान गणेश मंडळ या मंडळास सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ, व पुष्पहार देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार, धरमचंद लोढा ,अनिताताई खरात, सायराभाभी आतार,रेश्माताई शेख, गफुर सय्यद, प्रशांत सीताफ ,खंडागळे मॅडम, समाधान केसकर व इतर अनेक मान्यवर आणि गणेश उत्सव मंडळातील गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

