अग्रीमच्या संदर्भाने जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी काढले तडकाफडकी पत्र..!!
प्रकाश मुंडे / बीड जिल्हा प्रतिनिधी :-
केज तालुक्यातील पीकविमा अग्रिम मंजूर करताना केज तालुक्यातील सर्वच मंडळे वगळण्यात आल्याचा आरोप करत ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांनी शुक्रवारी (ता. एक) सायंकाळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मांडला. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाबासाहेब जेजुरकर यांनी सकारात्मक आश्वासन दिल्यानंतर त्यांनी रात्री उशिरा आंदोलन मागे घेतले. त्यानंतर तात्काळ जिल्हा अधीक्षक कृषी अधिकरी बाबासाहेब जेजुरकर यांनी तात्काळ पत्र काढुन प्रमाणे म्हटले आहे कि,
उपरोक्त विषयी दिनांक ०१.०९.२०२३ रोजीचे आपणाशी या कार्यालयात झालेले समक्ष चर्चेनुसार कळविण्यात येते कि, जिल्ह्यातील सोयाबीन पिकाचे अधिसूचना काढण्याची कार्यवाही संपलेली नाही. या नंतर दिनांक ०५.०९.२०२३ व गरज भासल्यास एक दोन जिल्हा समितीच्या सभा आयोजित करण्यात येतील. सदर सभामध्ये केज तालुक्यातील सर्वेक्षण पूर्ण होऊन प्राप्त होणारे मंडळांचे सर्व प्रस्ताव समितीचे समक्ष प्रस्तुत करण्यात येतील.
सोयाबीन पिकाचे बाबत अजून साधारण दोन सप्ताह कालावधी अधिसूचना काढण्यासाठी शिल्लक असल्याने कृपया आजवर खरीप २०२३ मध्ये झालेली कार्यवाही अंतिम आहे असे कृपया समजू नये. आणि आंदोलनाचा मार्ग स्वीकारू नये, प्रशासनास सहकार्य करावे, असे आपणास निवेदन आहे. दि.०५.०९.२०२३ च्या बैठकीमध्ये केज तालुक्यातील सर्व महसूल मंडळाचा समावेश करणे बाबत सर्व बाबीची शहानिशा करून शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेणे बाबत विषय मांडण्यात येईल. याबाबत जिल्हा माहिती अधिकारी यांचे करवी देखील सोबत जोडलेले प्रसिद्धी पत्रक प्रसिध्द करण्यात येत आहे.
असे पत्रामध्ये म्हटल्याप्रमाणे केज तालुक्यातील शेतकर्यांना पिकविमा अग्रीम मंजुर होईल हि सकारात्मक बाब केज तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी आहे. यामुळे जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांच्या ठिय्या अंदोलनाला यश आले आहे हे मात्र नक्की. विषेश बाब म्हणजे सद्दा नंदकिशोर मुंदडा हे आजारी असताना ही केज मतदारसंघातील सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी प्रशासकीय यंत्रणेवर धावून गेले आहेत व शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी दिवसरात्र धडपड करीत आहेत .

