shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जालन्यातील आंदोलकांवर झालेला लाठीचार्जचा व सरकारचा वंचित बहुजन युवा आघाडी कडून जाहीर निषेध


प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. ३ / जालन्यातील अंतिवाली सराटी येथील मराठा समाजातील आंदोलनकरांवर पोलिस प्रशासनाकडून 
झालेल्या अमानुष लाठीचार्ज चा व सरकारचा वंचित बहुजन युवा आघाडी कडून जाहीर निषेध करण्यात आला सांविधानाने दिलेल्या अधिकारातून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जालन्यात अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाने आंदोलन सुरू केले होते. 


आंदोलन करणे आमचा हक्क आहे. कायद्याच्या चौकटीत राहून आंदोलन करत असताना पोलिस निरीक्षक, पोलीस कर्मचारी यांनी आंदोलनकर्त्यांचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला एकीकडे उपोषण सुरू असताना दुसरीकडे सत्तेच्या माध्यमातून समाज बांधव यांच्यावर कारवाई म्हणुन अमानवी, अमानुषपणे लाठीमार करून आंदोलन करणाऱ्या मराठा समाज बांधवांवर अन्यायकारक लाठी चार्ज केला गेला. पोलिस अधिकारी व शिंदे फडणवीस, पवार सरकारने दिलेल्या आदेशानुसार हुकुमशाही सरकारचे धोरण लक्षात घेऊन गृहमंत्री फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वतीने देण्यात आलेला लाठी चार्ज आदेश मानवतेला काळिमा फासणारा व कलंकित करणारा असा आहे. शिंदे फडणवीस यांच्या सरकारचा जाहीर निषेध.

 मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. “सरकार हमसे डरती है पोलीस को आगे करती है” वंचित बहुजन युवा आघाडी सोलापूर जिल्हा माढा विभागच्या वतीने मराठा आदोलनकर्त्यांना जाहिर पाठिंबा असल्याचे वंचित बहुजन युवा आघाडी जिल्हाध्यक्ष साहेबराव वाघमारे यांनी सांगितले. सदर घटनेची नैतिक जबाबदारी स्विकारुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री फडणवीस साहेब यांनी आपले राजीनामे द्यावेत अशी मागणी वंचित बहुजन युवा आघाडी कडून करण्यात आली आहे.
close