shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भारत राष्ट्र समिती आणि समविचारी पक्ष संघटनांची शनिवारी श्रीरामपूरात आढावा बैठक


श्रीरामपूर प्रतिनिधी:
पुढे होवू घातलेल्या लोकसभा, विधानसभा, नगरपरिषद, जिल्हा परिषद,पंचायत समिती, ग्रामपंचायत आदि निवडणुकीकरीता सर्वांना सोबत घेवून रणनिती आखण्यासाठी शनिवार दि. १६ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता भारत राष्ट्र समिती, शेतकरी संघटना आणी समचारी पक्ष व संघटनांची बैठक येथील संगमनेर रोडवरील व्हीआयपी गेस्ट हाऊस या ठिकाणी आयोजित करण्यात आली असल्याची माहिती बी आर एस चे जिल्हा समन्वयक अशोकभाई बागुल यांनी दिली.
या बैठकीत भारत राष्ट्र समिती श्रीरामपूर व शेतकरी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्याच्या पुढील वाटचालीसाठी व राजकीय परिवर्तनाच्या दृष्टीने आढावा बैठक आयोजित केली आहे या बैठकीत लोकसभा निवडणूक विधानसभा नगरपरिषद जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत होणाऱ्या निवडणुकीत कसा सहभाग घ्यावा कशा पद्धतीने निवडणूक लढवाव्यात करिता समविचारी पक्षांना संघटना बरोबर घेऊन काम करायचे आहे यासाठी शेतकरी संघटना विर लहुजी सेना, हिंदू एकता आंदोलन, छावा संघटना, एकलव्य सामाजिक संघटना, वाल्मिकी समाज एकता परिषद संघटना एकत्रित येऊन आपले विचार मांडणार आहे निवडणुकी बाबत पुढील वाटचाल ध्येय धोरणे ठरवणार आहे यावेळी शेतकरी संघटनेच्या वतीने ॲड.अजित काळे हायकोर्ट व राज्य उपाध्यक्ष शेतकरी संघटना आणी बी आर एस चे जिल्हा समन्वयक अशोकभाई बागुल छावा संघटनेचे ॲड.सुभाष जंगले हिंदू एकता आंदोलन चे सुदर्शन शितोळे, वीर लहुजी सेनेचे हनीफ पठाण, बाळासाहेब बागुल, एकलव्य संघटनेचे शिवाजी गांगुर्डे, वाल्मिकी समाज एकता परिषदेचे अर्जुन आठवल इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या बैठकीत भारत राष्ट्र समिती पक्षाच्या वाढीसाठी प्रयत्न होणार असून पक्षाची भूमिका तेलंगणातील प्रगतीचा आढावा घेणार आहोत तसेच शेतकऱ्याचे प्रश्न पीक विमा कर्जमाफी सत्तेचे कर्ज वसुली पाट पाणी नियोजन शेतीची लाईट श्रीरामपूर तालुका दुष्काळ ग्रस्त करावा इत्यादी मागण्या सह निवडणुका हा विषय महत्त्वाचा आहे यासाठी  जिल्हा अध्यक्ष शेतकरी संघटना अनिल औताडे, युवराज जगताप, ॲड. सर्जेराव घोडे, अण्णासाहेब डावखर, गंगाधर पाटील चौधरी, बाळासाहेब थोरात, पंकज थोरात, साहेबराव चोरमल, शेतकरी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते नेते उपस्थित राहणार आहेत तसेच श्रीरामपूर शहर व तालुक्यातील झोपडपट्टी धारकांचा प्रश्न, रस्ते, गटारी, अतिक्रमण नियमित करून त्यांना सात बाराचे उतारे देण्यात यावेत. आहे त्या जागेवर घरकुले मंजूर करण्यात यावी, श्रीरामपूर शहराची झालेली दुर्दशा नागरिकांचे विविध प्रश्न  यावर  काय उपाययोजना करता येतील त्यासाठी चर्चा करून, माहिती घेऊन पुढील रूपरेषा ठरवणे, राजनीती ठरवणे,उत्सुक उमेदवार ठरविणे यासाठी सर्व राजकीय नेते कार्यकर्ते संघटना यांनी जास्तीत जास्त मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन देविदास पंडित,विलास साळवे, संतोष गायकवाड, लहानू त्रिभुवन, भीमराज दिवे, मधुकर लांडे, सुभाष हळनोर, रावसाहेब पवार, प्रवीण साळवे, बाळासाहेब दुधाळ ,ल बा कोल्हे, शिवाजी गोसावी, दत्तात्रय पाटील बडाख, बाळासाहेब जगताप,अन्वर शेख अशोक गायकवाड, रवी गायकवाड, हनुमंत पाटील खरात, अर्जुन पाटील खरात, राजू भगत, चंदू पाटील फोपसे, रवी भोसले, अशोक लोंढे, रावसाहेब मगर, दिलीप त्रिभुवन, एकनाथ रणनवरे, नामदेव कांबळे, एफ एम वाघमारे, लक्ष्मण मोहन, अशोक दिवे, कचरू साबळे, अरुण बागुल, अशोक साळवे, बाबासाहेब जगताप,बशीर शेख इ.मान्यवरांनी केले आहे.

संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
close