shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

‘अशोक' च्या माध्यमातून दरवर्षी श्रीरामपूरच्या बाजापेठेत ६०० कोटी रुपयांची उलाढाल


श्रीरामपूर मर्चन्ट असोसिएशनच्या नूतन संचालकांचा माजी आ.मुरकुटे यांचे हस्ते सत्कार

श्रीरामपूर प्रतिनिधी:
अशोक कारखाना माध्यमातून श्रीरामपूरच्या बाजारपेठेमध्ये ऊस पेमेंट, कामगारांचे पगार, बोनस, साखर विक्री, ऊस तोडणी मजूर व वाहतूकदार यांचे पेमेंट इत्यादीच्या माध्यमातून शहराच्या बाजारपेठेत दरवर्षी सुमारे ६०० कोटी रुपयांची उलाढाल होते. अशोक कारखाना ही तालुक्याची एकमेव कामधेनू असून त्यामुळे श्रीरामपूर तालुक्याच्या बाजारपेठेला संजीवनी मिळाली आहे. श्रीरामपूर मर्चंन्ट असोसिएशनचे नवीन संचालक मंडळ हे होतकरु, अभ्यासू व कार्यक्षम असल्याने असोसिएशनची भरभराट होईल. तसेच व्यापाऱ्यांचे प्रश्नही मार्गी लागतील, असा विश्वास अशोक कारखान्याचे चेअरमन माजी आ.भानुदास मुरकुटे यांनी व्यक्त केला.

श्रीरामपूर मर्चंट असोसिएनच्या नूतन संचालकांचा सत्कार माजी आ.श्री.मुरकुटे यांचे हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मर्चन्ट असोसिएशनचे अध्यक्ष राहुल मुथा, नुतन संचालक संजय कासलीवाल, अनिल लुल्ला, गौतम उपाध्ये, धर्मेश शाह, नाना नागले, प्रेमचंद कुंकूलोळ, कल्याण कुंकूलोळ, बाळासाहेब खाबिया यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भारत राष्ट्र समिती पक्षाचे तालुका उपाध्यक्ष सिद्धार्थ मुरकुटे, अशोक कारखान्याच्या संचालिका सौ.मंजुश्रीताई मुरकुटे, शहर अध्यक्ष नाना पाटील, सचिव गणेश भाकरे, शेतकरी सेवा केंद्राचे अमोल कोलते, अशोक बँकेचे संचालक जितेंद्र तोरणे, प्रमोद करंडे, सौ.शालिनी कोलते, संजय मोरगे, पंकज देवकर, संजय वेताळ, अन्वर शेख आदी उपस्थित होते.

*संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close