shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पन्नाशीच्या वळणावर .....


१४ सप्टेंबर २०२३

            कवयित्री : अनुरिता झगडे ,
          अहमदनगर , 8381007647

   पन्नाशीच्या वळणावर .....

आता आलीयस तू पन्नाशीच्या पार ,
जगून घे ग स्वतःसाठी आता थोडं फार ,
सुखवस्तू स्थिर झालीयस सुटलाय तुझा गुंता ,
हिमांशू ची सोडून दे तु आता चिंता .

दिलस शिक्षण संस्कार त्याला खूप खाल्ल्यास खस्ता ,
विश्वास ठेव हिमांशु त्याचा तोच काढेल रस्ता ,
एक फ्लॅट फक्त जास्त नकोत घरं ,
झोपण्यासाठी एक खोली पुरते हेच खरं .

भले आहे पारस बंगला गावाकडे शेती एकरी ,
सांग मात्र ताटात किती लागते गं भाजी भाकरी ,
स्वास्थ्य, समाधान बाहेर सारे त्या शेतात नाही पिकत ,
दिलेस पैसे किती तरी पण विकत नाही मिळत .
बबलू म्हणतोय अजून गाडी बंगला घेणार ,
निघून इथून जाताना सांग काय काय सोबत नेणार ,
रोज स्पर्धेत जिंकण्यासाठी भिजवल्यास तू टाचा ,
बदल आता जगण्याचा तो जीवघेणा साचा .

देवाने तुला श्वास दिलेत मोजून ,
 ठाऊक नाही तुलाच त्यातले किती बाकी आहेत अजून , 
आवरून घे आता हेवेदावे, दुनियादारी, कटकटी ,
बोल भेट मनसोक्त सगळ्यांशी तू घट्ट मारून मिठी .

नाती जपत सगळ्यांसोबत जगून घे जरा , 
म्हणत म्हणत छान छान गाणी ,
कधीच नाही तुला लागणार मग औषध दवा पाणी ,
जगून घ्यायचाय पुरेपूर हाच क्षण आत्ता ,
मैत्री हाच डावातला सर्वात मोठा पत्ता .

छंद कला जोपास जरा जी तुला आहेत प्यारी ,
वाचायला हे पुस्तक ती राहून गेलीत सारी ,
कवेत घे आनंदाला हीच ती वेळ ,
 श्वास एकदा थांबला की संपेल सारा खेळ .

काटकसर  नको आता खूप झाले पळून ,
वाळूसारखे क्षण मग जातील मुठीमधून गळून ,
पन्नाशीच्या वळणावर या नीट वळलं पाहिजे ,
 कुठे कधी थांबायचं हेच कळलं पाहिजे .

कवयित्री : अनुरिता झगडे ,
अहमदनगर
8381007647
close