shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

करमाळ्यातील कृष्णाजी नगर येथील नागरिक गटारी, रस्त्यांच्या समस्येमुळे त्रस्त

रहिवाशांनी दिले उपजिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदन

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. १३/ करमाळा तालुक्यातील कृष्णाजी नगर येथील नागरिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे त्रस्त झालेले आहेत. या भागातील गटारी व रस्त्यांच्या समस्यांमुळे कित्येक वर्षापासून नागरिक त्रस्त आहेत. कृष्णाजी नगर येथील रहिवासी गेल्या १५ ते २० वर्षापासून या भागात राहत आहेत तेव्हापासून या भागाकडे प्रशासनाचे संपूर्ण दुर्लक्ष आहे. येथील रहिवाशांनी करमाळा नगरपालिकेला वारंवार तक्रार करून देखील नगरपालिकेने आज पर्यंत या भागाकडे दुर्लक्ष केलेल्या आहे. करमाळा नगरपालिकेचा भोंगळ कारभार चाललेला आहे असे मत येथील रहिवाशांनी व्यक्त केले आहे.

या कॉलनी मध्ये रस्ते पूर्ण खराब झालेले आहेत सर्व गटारी फुटलेल्या आहेत. गटारी मधील घाण पाणी रस्त्यावर वाहत आहे. आणि त्यामुळे मच्छरांचे प्रमाण वाढले आहे. गटारी फुटल्यामुळे गटारीचे पाणी बोरच्या पाण्यामध्ये जात आहे व नळाच्या पाण्यामध्ये सुद्धा जात आहे त्यामुळे बोरमधून आणि नळाच्या पाण्यातून घाण पाणी येत आहे त्यामुळे येथे राहणाऱ्या नागरिकांची आरोग्यविषयक चिंता वाढत चाललेले आहे.

 यापूर्वी येथील रहिवाशांनी करमाळा नगरपालिका, तहसील कार्यालय करमाळा, जिल्हाधिकारी साहेब सोलापूर यांना लेखी स्वरूपात अर्ज करून तक्रार दिलेली आहे तरी देखील आज पर्यंत प्रशासनाने या संदर्भात कुठलेही ठोस पाऊल उचललेले नाही प्रशासनाला येथे राहणाऱ्या रहिवाशांच्या आरोग्याचे चिंता आहे का नाही? असा प्रश्न येथे राहणाऱ्या रहिवाशांना पडला आहे. म्हणून प्रशासनाला जाग येण्यासाठी व पुन्हा आठवण करून देण्यासाठी म्हणून येथील रहिवाशांनी आज दि. १३/९/२०२३ रोजी पुन्हा एकदा उपजिल्हाधिकाऱ्यांना लेखी अर्ज दिलेला आहे. आणि आमच्या समस्या कडे लक्ष द्या अशी कळकळीची विनंती केलेली आहे.
close