shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शुक्रवारी इंदापूर येथे भारतशेठ शहा दहीहंडी चषकाचे आयोजन.

शुक्रवारी इंदापूर येथे भारतशेठ शहा दहीहंडी  चषकाचे आयोजन.

 प्रेक्षकांसाठी खास सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन.
 

इंदापूर (प्रतिनिधी): इंदापूर शहरात शुक्रवार दिनांक १५ सप्टेंबर २०२३ रोजी सायंकाळी ७ वाजता जुने मार्केट यार्ड मैदान इंदापूर येथे भरतशेठ शहा मित्रपरिवार आयोजित भव्य दहीहंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये प्रसिद्ध सिनेअभिनेत्री स्मिता गोंदकर, शितल पाटील तसेच खास आकर्षण रशियन कलाकार फायर शो चे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाचे अँकर म्हणून सेलिब्रिटी मुग्धा ठाकूर या उपस्थित राहणार आहेत. सदर कार्यक्रमास इंदापूर शहरातील सर्व दहीहंडी संघास निमंत्रित केले असून सदर ठिकाणी दहीहंडी स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले असून यास उपस्थित राहण्याचे आवाहन  भरतशेठ शाह मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे. या कार्यक्रमास महिला प्रेक्षक वर्गासाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात येणार आहे .सदर कार्यक्रम हा इंदापूर शहरातील सर्व नागरिकांना सहभागी होता येईल अशा पद्धतीने नियोजित केला असल्याची माहिती मित्र परिवाराच्या वतीने देण्यात आली.
close