shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पांडुरंग तात्या शिंदे मित्र परिवाराच्या वतीने शंभू महादेव कावड सोहळ्याच्या कावडीचे महाआरती व महाप्रसाद.

पांडुरंग तात्या शिंदे मित्र परिवाराच्या वतीने शंभू महादेव कावड सोहळ्याच्या कावडीचे महाआरती व महाप्रसाद.

जयवंत नायकुडे यांना समाज भूषण पुरस्काराने केले सन्मानित.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर शहरात सालाबाद प्रमाणे श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी पांडुरंग तात्या शिंदे मित्रपरिवार यांच्या वतीने शंभू महादेव कावड सोहळा येथील कावडीचे विधियुक्त पूजा करून अनेक भाविक भक्तांच्या हस्ते महाआरती सायंकाळी  संपन्न झाली. यावेळी बेस्ट कॉलेज ऑफ महाराष्ट्र पुरस्कार मिळाल्याबद्दल जय इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग इंदापूरचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जयवंत नायकुडे यांना समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी त्यांना पुरस्कार सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यानंतर परंपरागत पद्धतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी अनेक भाविक भक्तांनी या प्रसादाचा लाभ घेतला. उपस्थित सर्व भाविक भक्तांचे  भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा इंदापूर तालुक्याचे अध्यक्ष, क्रांतीज्योती विचार मंच महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष, इंदापूर नगर परिषदेचे माजी विरोधी पक्ष नेता व या कार्यक्रमाचे आयोजक पांडुरंग शिंदे यांनी स्वागत करून आभार मानले.
close