इंदापुरातील अंबिकानगरमधील महादेव मंदिरात पूजेनंतर काही काळात नागाचे दर्शन.
इंदापूर प्रतिनिधी : शेवटच्या श्रावणी सोमवारनिमित्त इंदापूर शहरात विविध पिकांच्या मंदिरामध्ये भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केलेली दिसून येत होती.दरम्यान, इंदापूर शहरातील अंबिकानगर भागातील महादेवाच्या मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भक्तांना अचानक पिंडी शेजारी नागाचे दर्शन झाले.
पूजा झाल्यानंतर काही वेळातच मंदिराच्या गाभाऱ्यात हा नाग दिसून आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात असताना. यावेळी भयभीत झालेले भक्त तत्काळ बाहेर निघाले. त्यानंतर महादेवाच्या पिंडीसमोर जात नाग फणा काढून उभा राहिला. ही बातमी वाऱ्यासारखी पसरल्याने भक्तांची मोठी गर्दी झाली. काहींनी नागाचे दर्शन घेतले. दरम्यान, नगरसेवक पोपट शिंदे व त्यांच्या मित्रपरिवाराने तत्काळ सर्पमित्रास बोलावून नागास ताब्यात घेऊन त्याला निसर्गाच्या सान्निध्यात सोडून दिले.

