shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांनी ३२ शाळा एकाच इंदापूर तालुक्यासाठी दिल्या - खासदार सुप्रियाताई सुळे.

शरद पवार  मुख्यमंत्री असताना त्यांनी ३२ शाळा एकाच इंदापूर तालुक्यासाठी दिल्या - खासदार सुप्रियाताई सुळे.
 
भांडगावात येथे शालेय खो-खो स्पर्धेचे केले उद्घाटन.
इंदापूर (प्रतिनिधी):
 शरद पवार  मुख्यमंत्री असताना त्यांनी ३२ शाळा एकाच इंदापूर तालुक्यासाठी दिल्या .  पवार यांच्यावर प्रेम करणारे जे कार्यकर्ते होते. त्यांनी शिक्षणाचे महत्त्व जाणले . नुसत्या संस्था काढल्या नाहीत तर त्यांनी संस्था चांगल्या चालवल्या. त्यापैकी अशोकराव घोगरे यांनी शैक्षणिक संस्था चांगली चालवली.

भांडगाव (ता. इंदापूर) येथील माध्यमिक विद्यालय येथे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र राज्य इंदापूर तालुका अंतर्गत आयोजित शालेय खो-खो स्पर्धेचे उद्घाटन सुळे यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अशोकराव घोगरे, पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य प्रवीण माने, युवक नेते डॉ. शशिकांत तरंगे, इंदापूर क्रीडा अधिकारी महेश चावले, उमेश घोगरे, विजय घोगरे, अभिजीत घोगरे, सागर मिसाळ, छाया पडसळकर, डॉ. लक्ष्मणराव आसबे, कालिदास देवकर, छगनराव तांबिले, संजय देवकर, विकास खिलारे, संस्थेचे प्राचार्य सुभाष गायकवाड पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तसेच यावेळी खासदार सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की,राज्य सरकारने दोन आठवड्यानंतर सर्वपक्षीय बैठक बोलावलेली आहे. जालन्याच्या घटनेत पहिला पोहोचणारा नेता कोण असेल याची चौकशी केली तर नाव शरद पवार महाराष्ट्रने पाहिले आहे. अमानुषपणे कशासाठी लाठीचार केला. महाराष्ट्र सरकारकडे मागणी आहे की, मराठा धनगर लिंगायत व मुस्लीम या सगळ्यांच्या आरक्षणाची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. येथे २०० आमदार आहे म्हणतात व केंद्रात ३०० खासदार आहे बोलतात. मग प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याची या सरकारची करायची इच्छा नाही. त्यामुळे महत्त्वाचे विषय मार्गी लागत नाहीत, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.
close