श्रावण महिन्यातील चौथा सोमवारी ग्रामदैवत इंद्रेश्वर देवाची व ग्रामदैवत सिद्धेश्वर देवाच्या दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी.
इंदापूर प्रतिनिधी:( दि. ११ सप्टेंबर) रोजी श्रावण महिन्यातील चौथा सोमवार ग्रामदैवत इंद्रेश्वर देवाची ग्रामदैवत सिद्धेश्वर देवाची पहाटेची आरती गिरीश काका गुरव आणि श्रीकांत काका गुरव यांनी पार पाडली. यानंतर दिवसभर श्रावणी सोमवारच्या शेवटचा सोमवार असल्याने भाविकांची दर्शनासाठी मांदियाळी दिसून आली.
यावेळी दोन्हीही देवांची महाआरती केली. यावेळी देवस्थानचे ट्रस्टी प्रसन्न दुनाखे, निलाखे सर, सुनील भंडारी ,नागेश भंडारी, राजकुमार ढोले, महेश भिंगे, संदिप वाशिंबेकर, घोडके साहेब, सर्व ट्रस्टी उपस्थित होते.या सर्वांनी दोन्हीही मंदिरा मध्ये प्रसादासाठी केळी राजगिराची वडी, सकाळची आरती संपल्यानंतर दिवसभर प्रसाद वाटण्यात आला. दिवसभर दोन्हीही मंदिरामध्ये मोठ्या संख्येने भाविक
जमा झालेले होते. आरती वेळी इंदापूर नगरीच्या माजी नगराध्यक्षा अंकिताताई शहा, व महिला वर्ग, उपस्थित होता.मनोभावे इंद्रेश्वराचे सिद्धेश्वराचे दर्शन घेत होते.
ग्रामदैवत सिद्धेश्वराची पालखी ग्रामप्रदक्षणा साठी सायंकाळी सहा वाजता मंदिरातून निघत वाजत गाजत इंदापूर शहरातून सिद्धेश्वराच्या पालखीची मिरवणूक निघत. इंदापूरच्या मुख्य बाजारपेठेतील विठ्ठलाच्या मंदिराजवळ पालखी गेल्यानंतर विठ्ठलाची आणि सिद्धेश्वराची भेट घेत येथे आरती झाल्यानंतर पुढे दत्त मंदिर, हनुमान मंदिर, राशीनची आई, या प्रमुख देवतांची आरती झाल्यानंतर वाजत गाजत सिद्धेश्वराची पालखी इंद्रेश्वराच्या मंदिरात येत, इंद्रेश्वराची, रामाची, हनुमानाची आरती झाल्यानंतर, सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये वाजत गाजत पालखी मंदिरामध्ये प्रवेश करत. पालखीतील सिद्धेश्वराचा मुकुट महादेवाच्या पिंडीवर ठेवला जातो, नंतर आरतीला सुरुवात होते. महादेवाची आरती झाल्यानंतर प्रसादाचे वाटप केले जात. हजारो भाविक उपस्थित होते. आरती महामंडळाचे प्रमुख सफल घासकाटू, उपाध्यक्ष महादेव चव्हाण सर, हमीदभाई आत्तार, अंकुश काळे , गुपित होनराव, आप्पा घासकाटू , विठ्ठल बानकर, आरती मंडळातील महिलावर्ग, आरती मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते. प्रा .कृष्णा ताटे सर, प्रदीप पवार, रघुनाथ खरवडे , श्रावण महिन्यातील सर्वात मोठा सण म्हणजे श्रावणी सोमवार ची ही फार मोठी उत्सव भरला होता. अनेक व्यापाऱ्यांची परंपरा देवासाठी कापूर देणे, फळांचे वाटप करणे, त्यातच हमीद भाई यांच्या वडिलांपासूनची
घराण्याची जुनी परंपरा सिध्देश्वराची पालखी त्यांच्या घराजवळ आल्यावर इबीताचा खडा आणि एक कापूर डबी प्रत्येक सोमवारी देवासाठी ते देतात त्यांनी परंपरा जपली . अशा परंपरा इंदापूर शहरामध्ये आजही आहे. प्रत्येक भक्ताच्या जीवनामध्ये समाधान व्यक्त करणाऱ्या असतात. अशाप्रकारे श्रावण महिन्यातील चौथ्या आणि शेवटच्या सोमवारची सांगता झाली.

