इंदापूर प्रतिनिधी: मौजे.तिखी येथे डॉ. शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालय, बारामती येथील कृषी कन्याकडून ग्रामीण कृषी कार्यानुभव अनुभव या उपक्रमांतर्गत शून्य उर्जेवर आधारित शीतगृहाचे शेतकऱ्यांसाठी प्रात्यक्षिक घेण्यात आले.
शेतमालाची साठवण कमी तापमान आणि योग्य आद्रतेत शीतगृहामध्ये करता येते आणि त्यामुळे त्यांची साठवण कालावधी वाढवणे शक्य होते. त्यामुळे शेतमाल जास्त काळ टिकतो व शेतमालाची होणारी नासाडी टाळता येते. शून्य उर्जेवर आधारित शीतगृहाची उभारणी करणे शेतकऱ्यांसाठी सहज शक्य आणि आर्थिक दृष्ट्या परवडणारी आहे.
विना ऊर्जा ,विना खर्च
ताजा माल करू उपलब्ध !!
या संकल्पनेवर आधारित प्रात्यक्षिक कृषी कन्या कु. आरती जाधव, तेजस्विनी मारकड , वर्षा पांढरे , शिवांजली रणवरे , मंगल दिवटे , वैष्णवी गायकवाड आणि अपेक्षा हरगुडे यांनी घेतले, आणि यासाठी शेतकऱ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळाला . या प्रात्यक्षिकासाठी प्राध्यापक पाटील मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.

