रेणुकामाता मल्टिस्टेट संस्थेच्या वतीने शिक्षण दिनानिमित्त प्राध्यापक डॉ. सुभाष देशमुख सर यांचा पुरस्कार देऊन सन्मान..
पाथर्डी प्रतिनिधी:
श्री रेणुकामाता मल्टीस्टेट को- ऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेडच्यावतीने तिसगांव शाखेत शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी प्राध्यापक डॉ. सुभाष देशमुख सर यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला,याप्रसंगी संस्थेचे कर्मचारी तथा शिक्षकमित्र परिवार आदि उपस्थित होते.
श्री रेणुकामाता मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेडच्यावतीने समाजाभिमुख कार्य करणाऱ्या शिक्षकांचा गौरव करण्याचे पवित्र कार्य संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर प्रशांत भालेराव करत आहेत, त्यांनी संस्थेच्या तिसगांव शाखेत शिक्षक दिनाचे औचित्य साधून प्राध्यापक डॉक्टर सुभाष जगन्नाथ देशमुख, दादा पाटील राजळे शिक्षण संस्थेचे दादा पाटील राजळे कला व विज्ञान महाविद्यालय आदिनाथ नगर तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर येथे शैक्षणिक वर्ष १९९१ पासून कार्यरत असलेले (अर्थशास्त्र विभाग आणि वाणिज्य शाखाप्रमुख) संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ७७ संशोधन लेख राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध,०४ पुस्तके प्रकाशित, ०२ संपादित पुस्तके प्रकाशित, ०२ विद्यार्थी एम.फील उत्तीर्ण, ०२ विद्यार्थी पीएच.डी. नोंदणीकृत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत अर्थशास्त्र विषयासाठी मार्गदर्शक म्हणून कार्यरत. राज्यस्तरीय वाद-विवाद व वक्तृत्व स्पर्धांना परीक्षक म्हणून, राज्य राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील चर्चासत्रे आणि परिषदांमध्ये साधन व्यक्ती, १५ पुरस्कार प्राप्त,सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती व इतर उत्सवांमध्ये प्रमुख पाहुणा किंवा वक्ता , शिक्षण संस्थेमधून माहिती अधिकारी, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक व संयोजक, ग्रंथालय सल्लागार समिती अध्यक्ष, गेली १८ वर्षांपासून माजी सैनिक सत्कार सोहळा आयोजक व समिती अध्यक्ष, सामाजिक शास्त्री मंडळ अध्यक्ष, प्रवेश व परीक्षा समिती, विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक्ष स्प्रिंकलरचा संच जोडणी प्रशिक्षण, भारतीय आयुर्विमा महामंडळातील सेवेच्या संधी, भारतीय पोस्ट विभागातील सेवेच्या विविध संधी, बँकिंग क्षेत्रातील सेवेच्या संधी यासारख्या विषयांवर मार्गदर्शनपर मेळाव्यांचे आयोजन, सर्व रोग निदान आणि रक्तदान शिबिरांचे आयोजन केले. आर्थिक दृष्ट्या मागास विद्यार्थ्यांसाठी आशेचा किरण ठरलेला शिक्षक, विद्यार्थिनींसाठी संरक्षक भिंत म्हणून काम करणारा शिक्षक, शीलवान, क्षमाशील व कर्तृत्ववान आदर्श शिक्षक प्राप्त, विद्यार्थ्यांना ग्रामीण भागात अर्थशास्त्राचा ज्ञान स्रोत ठरलेला शिक्षक, विद्यार्थी प्रिय आणि शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांची शेतीशी नाळ जोडणारा हाडाचा शिक्षक, सरांचे अनेक विद्यार्थी शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य, राजकीय तसेच सार्वजनिक, सहकारी व खाजगी बँकांमध्ये मॅनेजर पर्यंतच्या पोस्टवर सेवेत आहेत.
हा सत्कार संस्थेच्या तिसगांव येथील कार्यालयात मॅनेजर श्री. खंडागळे सोमनाथ अंकुश, कॅशियर श्री. झरेकर देविदास क्लार्क श्री. गायकवाड अनिकेत विश्वासराव आणि म्हस्के अनिकेत तसेच श्रीमती बडेकर सीमा यांच्या उपस्थितीत प्रमाणपत्र व पुष्प देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
श्री रेणुका माता मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगरचे मुख्य कार्यालय रेणुकाभवन, पाईपलाईन रोड, सावेडी, अहमदनगर, महाराष्ट्र येथे असून संस्थेने भारतात ९ राज्यांमध्ये १३५ शाखांमार्फत काम चालू आहे. आज अखेर संस्थेचा दहा लाखांचा सभासद टप्पा पूर्ण झाला आहे. संस्थेची १७ वर्षात यशस्वी वाटचाल सुरू असून त्यांच्याकडे उपलब्ध सुविधांमध्ये क्यू आर कोड, मोबाईल ॲप, लॉकर सुविधा, इंटरनेट बँकिंग, सर्व प्रकारचे बिल पेमेंट, एटीएम सुविधा, एटीएम कार्ड सुविधा, मोबाईल व इंटरनेट बँकिंग, सेव्हीग आणि करंट अकाउंट, आर. टी. जी. एस. तसेच एन. इ. एफ. टी., क्रेडिट कार्ड सुविधा, लॉकर सुविधा, पाॅज टर्मिनल, हौसिंग कर्ज सुविधा आहेत.
श्री रेणुका माता मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगरचे मुख्य कार्यालय रेणुकाभवन, पाईपलाईन रोड, सावेडी, अहमदनगर, महाराष्ट्र येथे असून संस्थेने भारतात ९ राज्यांमध्ये १३५ शाखांमार्फत काम चालू आहे. आज अखेर संस्थेचा दहा लाखांचा सभासद टप्पा पूर्ण झाला आहे. संस्थेची १७ वर्षात यशस्वी वाटचाल सुरू असून त्यांच्याकडे उपलब्ध सुविधांमध्ये क्यू आर कोड, मोबाईल ॲप, लॉकर सुविधा, इंटरनेट बँकिंग, सर्व प्रकारचे बिल पेमेंट, एटीएम सुविधा, एटीएम कार्ड सुविधा, मोबाईल व इंटरनेट बँकिंग, सेव्हीग आणि करंट अकाउंट, आर. टी. जी. एस. तसेच एन. इ. एफ. टी., क्रेडिट कार्ड सुविधा, लॉकर सुविधा, पाॅज टर्मिनल, हौसिंग कर्ज सुविधा उपलब्ध असल्याचे तिसगांव शाखा मॅनेजर सोमनाथ खंडागळे म्हणाले.
प्रा.डॉ.सुभाष देशमुख यांना मिळालेल्या या पुरस्कार सन्मानाबद्दल शैक्षणिक क्षेत्रासह विविध क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
सहयोगी:
पत्रकार वजीरभाई शेख -पाथर्डी
संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

