shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नंदकिशोर मुंदडांनी केज मतदारसंघातील सात मंडळात अग्रीम आणला खेचून..!!

प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधी  :-                 केज मतदारसंघाचे जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा काकाजी व आ. नमिता अक्षय मुंदडा यांनी केज मतदारसंघातील सर्वसामान्य शेतकऱ्यांना होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली असून केज मतदारसंघातील सात मंडळात अग्रीमला मान्यता मिळाली आहे. 

यात केज मतदारसंघातील होळ, केज, चिंचोली माळी, हनुमंत पिंप्री, मस्साजोग, युसुफ वडगाव व बनसारोळा या सात मंडळात अग्रीम लागू झाला आहे. सोयाबीन अग्रीम पिक विम्यास मान्यता भेटली असून बीड जिल्हा प्रशासन च्या वतीने अग्रीम पिक विमा देण्याबाबत कार्यवाही सुरू झाली आहे.  बीड जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीने शेतकरी हातबल झाला आहे. केज मतदारसंघातील परिस्थिती तर फारच गंभीर आहे. परंतु केज मतदारसंघातील मंडळात अग्रीम पिक विमा लागू झाला नव्हता. या तुघलकी अन्याया विरोधात भाजपचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा काकाजी यांनी ठिय्या आंदोलन पुकारले होते. याची तात्काळ दखल घेऊन जिल्हाधिकारी दीपा मुंडे यांनी केज मतदारसंघातील सात मंडळाचा सोयाबीन अग्रीम पिक विम्यामध्ये समावेश करुन स्वाक्षरी केली आहे. व केज मतदारसंघातील सात मंडळात अग्रीम लागू झाला आहे.                   

या निर्णयामुळे जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा व केज मतदारसंघाच्या लोकप्रिय आ. नमिता अक्षय मुंदडा यांचे केज मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे.

close