शनिवारी होणार आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुणे जिल्हा(ग्रामीण) नवनियुक्त पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र वितरण समारंभ.
इंदापूर प्रतिनिधी: शनिवारी दि. ९ सप्टेंबर रोजी नेहरू मेमोरियल हॉल पुणे जिल्हा परिषद नवीन इमारती शेजारी डॉ बाबासाहेब आंबेडकर मार्ग पुणे येथे दुपारी १ वाजता शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुणे जिल्हा ग्रामीण( अजित पवार गट)नवनियुक्त पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र देण्याचा कार्यक्रम संपन्न होणार असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुणे जिल्हा ग्रामीण यांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते व राज्याचे सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील , राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ रूपालीताई चाकणकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, इंदापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार दत्तात्रय भरणे, खेड विधानसभा मतदार संघाचे आमदार दिलीपराव मोहिते पाटील, मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला असल्याची माहिती पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुणे ग्रामीणचे अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी दिली.
,

