कोणत्याही क्षेत्रामध्ये गुरूंचे महत्त्व अनन्यसाधारण -
धनंजय रणवरे.
एन. ई .एस. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील निमसाखर येथे शिक्षक दिन उत्साह साजरा .
इंदापूर प्रतिनिधी:निमसाखर एज्युकेशन सोसायटीचे एन. ई .एस. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील निमसाखर, ता. इंदापूर, जि. पुणे ,येथे ५ सप्टेंबर रोजी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन उत्साह साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक चंद्रकांत रणवरे हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे विद्यमान सचिव धनंजय रणवरे उपस्थित होते. याप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाचे विभाग प्रमुख चंद्रकांत बलभीम बोंद्रे, विद्यालयाच्या पर्यवेक्षक मधुकर खरात, शिवदत्त रणवरे, सचिन रणवरे इ उपस्थित होते.
आजच्या विद्यार्थ्याने आपले आई-वडील गुरुजन वर्ग समाजातील जेष्ठ मंडळी या सर्वांचा आदर केला पाहिजे. कोणत्याही क्षेत्रामध्ये गुरूंचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आज पर्यंत जगामध्ये जेवढी महान व्यक्तिमत्व तयार झाली ती केवळ गुरूंच्या मार्गदर्शनामुळेच. म्हणून आपण गुरुने दिलेले ज्ञान आपल्या दैनंदिन जीवनात आत्मसात केले पाहिजे. म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली भरपूर अभ्यास केला पाहिजे व आपल्या विद्यालयाचा नावलौकिक वाढवला पाहिजे. कोणत्याही प्रकारचा गर्व, मी पणा
अंगी बाळगू नका,, एकमेकांबद्दल आपुलकीची, प्रेमाची सहकार्याची, भावना ठेवली पाहिजे. असे मत संस्थेचे विद्यमान सचिव धनंजय रणवरे यांनी व्यक्त केले. व सर्व शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. त्यावेळी शिवदत्त धनंजय रणवरे यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. व सर्वांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. त्यावेळी कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी व हायस्कूल मधील विद्यार्थ्यांनी आपापली मनोगत व्यक्त केली. कॉलेजमधील व हायस्कूल मधील मुला मुलींनी आज शिपायापासून ते प्राचार्य पर्यंतची सर्व कामे केली. व त्यांना आलेले अनुभव त्यांनी आपल्या मनोगतातुन व्यक्त केले. स्वाती नगरे मॅडम यांनी आपल्या मनोगतातुन विद्यार्थ्यांना खूप छान मार्गदर्शन केले. पर्यवेक्षक खरात सर यांनी सर्वांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तर विभाग प्रमुख बोंद्रे,सर यांनी उत्तम प्रकारे केलेल्या कार्यक्रमाचे कौतुक केले.चव्हाण सर यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.शेंडे मॅडम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तर जगताप मॅडम यांनी कार्यक्रमाचे आभार मानले. सूत्रसंचालन अनुराधा रणवरे मॅडम यांनी केले. प्राचार्य चंद्रकांत गोपाळराव रणवरे यांनी सांस्कृतिक विभागाचे खूप कौतुक केले. व त्यांनी देखील सर्वांना खूप शुभेच्छा दिल्या.

