शासनाने जिल्हा परिषद शाळांकडे अधिक लक्ष केंद्रित करणे गरजेचे - मयुरा पाटील.
राजमाता ग्रुपच्या वतीने जिल्हा परिषद शाळा नंबर १ व नंबर २ येथे शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचा सत्कार .
इंदापूर प्रतिनिधी: शासनाने जिल्हा परिषद शाळांकडे अधिक लक्ष केंद्रित करणे गरजेचे असल्याचे इंदापूर येथे राजमाता ग्रुपच्या वतीने जिल्हा परिषद शाळा नंबर १ व शाळा नंबर २ येथे शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी राजमाता ग्रुप इंदापूरच्या अध्यक्षा मयुरा पाटील आपले मत व्यक्त करताना म्हणाल्या.
तसेच पाटील त्या पुढे म्हणाले की, आज जिल्हा परिषद शाळांमध्ये येण्याचा उद्देश हाच की जिल्हा परिषदेच्या शाळा वाचविणे ही काळाची गरज आहे. या शाळांमधील गुणवत्ता इतर शाळांमध्ये मिळणे अशक्य आहे ,येथील मुले ही सर्व गुणसंपन्न असतात व त्यांच्यासाठी येथील शिक्षकही मोलाचे कष्ट करतात .शासनाने जिल्हा परिषद शाळांकडे अधिक लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.
यावेळी शाळेचे शिक्षक कृष्ण शिंदे सर, दत्तात्रय ठोंबरे सर, सचिन वारे सर, सौ स्मिता गुंड मॅडम, श्रीमती भारती पोळकर मॅडम, श्रीमती पुष्पा दळवी मॅडम,श्रीमती वर्तले वैशाली मॅडम, सौ ज्योती पवार मॅडम व श्रीमती रूकसाना शेख मॅडम उपस्थित होत्या.
यावेळी बोलताना श्रीमती मनीषा मोटे मॅडम म्हणाल्या, राजमाता ग्रुपच्या वतीने केलेला सत्कारामुळे आम्हाला खूप आनंद झाला. शाळेच्या प्रती सर्वांची निष्ठा पाहून सर्वांनाच आनंद झाला.त्या म्हणाल्या मयुरा पाटील ही शाळेची माजी विद्यार्थिनी असून शाळेप्रती तीने व्यक्त केलेली निष्ठा ही खरच कौतुकास्पद आहे. ग्रुपमधील बाकीच्या उपस्थित महिलांचेही त्यांनी आभार मानले.
शाळेमधील इतर शिक्षकांनाही आपले मनोगत व्यक्त केले. राजमाता ग्रुप तर्फे ग्रुपच्या उपाध्यक्षा सौ.स्मिता पवार यांनीही सर्व शिक्षकांचे आभार मानले व शुभेच्छा दिल्या. यावेळी ग्रुप मधील सौ.संगीता कवितके, सौ.सारिका सनगर, सौ अहिल्या कवितके ,सौ सोनाली कवितके ,सौ सुजाता पवार ,सौ अंकिता पवार या महिला उपस्थित होत्या.

